Amravati Accident : अमरावतीत दूषित पाण्याने डायरियाची लागण, पाचडोंगरी गावात दोघांचा मृत्यू, 35 जणांवर रुग्णालयात उपचार
अमरावती : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी गावांतील नागरिकांना दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण झाली. यामुळं 2 जणांचा मृत्यू झाला, तर 35 जणांवर काटकुंभ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्युत पुरवठा बंद असल्याने नळाद्वारे पाणीपुरवठा बंद आहे.
अमरावती : मेळघाटातील (Melghat) चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी गावांतील नागरिकांना दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण झाली. यामुळं 2 जणांचा मृत्यू झाला, तर 35 जणांवर काटकुंभ (Katkumbh) येथील रुग्णालयात (Ambulance) उपचार सुरू आहेत. विद्युत पुरवठा बंद असल्याने नळाद्वारे पाणीपुरवठा बंद आहे. विहिरीतील अशुद्ध पाणी पिल्याने डायरियाची लागण झाली. मेळघाटमधील परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे तर रुग्णवाहिका गावात तैनात करण्यात आल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले हे काटकुंभ गावासाठी रवाना झालेत. साथरोगाची लागण झाल्याची माहिती मिळताच चुरणी येथील आरोग्य पथक पाचडोंगरी येथे पोहोचले. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रुग्णांवर उपचार देतायेत. यासह चुरणी आरोग्य केंद्रात देखील काही नागरिकांवर उपचार सुरू आहेत. परिस्थिती गंभीर असणाऱ्या रुग्णांना सध्या अमरावतीमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.
विहिरीतील दूषित पाणी पिल्याने आजार
अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. अमरावतीच्या मेळघाटातील पाचडोंगरी या गावात दूषित पाणी पिल्याने 50 हून अधिक नागरिकांना साथरोगाची लागण झाली आहे. तर दोघांचा यात मृत्यू देखील झाला आहे. साथरोगाची लागण झाल्याची माहिती मिळताच चूरणी येथील आरोग्य पथक पाचडोंगरी येथे पोहोचले. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रुग्णांवर उपचार देतायेत. गावालगत एका खाजगी विहीर जमिनीलगत असल्यामुळे त्यामध्ये बाहेरील कचऱ्यासह अन्य वस्तू त्या विहिरीमध्ये पडल्यात. त्या विहिरीचे पाणी गावातील नागरिकांनी पिल्यामुळे त्यांना साथरोगाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी दखल घेत परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचे सांगितले. आरोग्य विषयक सुविधा त्या ठिकाणी पोहोचाव्यात यासाठी खासदार नवनीत राणांचे देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र रागेश्री माहुलकर यांनी दिली.
विहिरीचे दूषित पाणी पिल्याने लागण
पाचडोंगरी येथे विद्युत पुरवठा बंद असल्यानं पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळं गावातील लोकांनी विहिरीचे पाणी पिले. पण, हे पाणी दूषित असल्यानं डायरियाची लागण झाली. यात दोघांचा मृत्यू झाला. पन्नास जणांना डायरियाची लागण झाली. विहिरीत कचरा टाकला होता. त्यामुळं पाणी दूषित झालं होतं. पाण्याचा वापर केला जात नव्हता. पण, नळाचा पाणीपुरवठा बंद झाल्यानं या विहिरीचे पाणी वापरण्यात आले. त्यामुळं डायरियाची लागण झाल्याची माहिती आहे.