Dipali Sayyed : उमा खापरे विरोधात दीपाली सय्यद ओशिवरा पोलिस ठाण्यात दाखल; तक्रार दाखल

आपल्याला धमकी दिल्या प्रकरणी ही तक्रार देण्यात आली असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे. मी तक्रार दाखल केली असून त्याचे रिझल्ट लवकरच आपल्याला दिसतील

Dipali Sayyed : उमा खापरे विरोधात दीपाली सय्यद ओशिवरा पोलिस ठाण्यात दाखल; तक्रार दाखल
अभिनेत्री दीपाली सय्यदImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 8:20 PM

मुंबई : आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे, पुरगस्तांची मदत, कोरोना काळात मदत आणि जागरुक करण्याच्या कार्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद चांगल्याच चर्चेर होत्या. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि राज्याच्या राजकारणाच्या मुखपृष्ठावर आल्या आहेत. अभिनेत्री दीपाली सय्यद (Actress Dipali Sayyed) यांनी शिवसेनेत प्रवेश करत आपला दबदबा बनवला आहे. त्यानंतर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधत होत्या. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करताना दीपाली सय्यद यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. हीच टीका आता दीपाली सय्यद यांना महागात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याप्रमाणे दीपाली सय्यद यांच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. तर पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस दिली होती. त्याप्रमाणे दीपाली सय्यद आज ओशिवरा पोलिस स्टेशनला दाखल झाल्या होत्या. असे म्हटले जाते की, उमा खापरे विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी त्या येथे आल्या. तर उमा खापरे यांनी दीपाली सय्यद यांना धमकी दिली होती. त्याविरोधातच दीपाली सय्यद आज ओशिवरा पोलिस स्टेशनला (Oshiwara police station)दाखल झाल्या होत्या.

दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्द वापरत टीका केली होती. त्यांचे ट्वीट सोशल मीडियावर चांहगलेच चर्चेत आलं होतं त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, ‘किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा… (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्या भारताने पाहिला नसेल” त्यानंतर दीपाली सय्यद त्यांच्यावर ओशिवारा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या तक्रारीनंतर पोलीस काय कारवाई करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

तर आपल्याला धमकी दिल्या प्रकरणी ही तक्रार देण्यात आली असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे. मी तक्रार दाखल केली असून त्याचे रिझल्ट लवकरच आपल्याला दिसतील असेही दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. तर उमा खापरे यांनी दीपाली सय्यद यांना बदडून काढू अशी धमकी दिली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.