Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Salian Case: काय आहे दिशा सालियन प्रकरण? मायानगरीत कसा आला भूकंप, आदित्य ठाकरे का हैराण? वाचा A टू Z

Disha Salian Case: 8 जून 2020 ची ती रात्र... दिशाचा बलात्कार करून हत्या... आदित्य ठाकरे यांचं प्रकरणाशी कनेक्शन काय? आदित्य ठाकरे का हैराण? वाचा A टू Z, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिशा सालियन प्रकरणाची चर्चा...

Disha Salian Case: काय आहे दिशा सालियन प्रकरण? मायानगरीत कसा आला भूकंप, आदित्य ठाकरे का हैराण? वाचा A टू Z
Follow us
| Updated on: Mar 21, 2025 | 11:54 AM

Disha Salian Case: 8 जून 2020 ची ती रात्र… त्या रात्र मलाडच्या एक इमारतीत 14 व्या मजल्यावर पार्टी सुरु होती. जी दिशा सालियनच्या आयुष्यातील शेवटची पार्टी ठरली. गजबजलेल्या त्या पार्टीत अचानक शांतता निर्माण होते आणि कळतं दिशा आता जगात नाही. दिशा सालियन हिने पार्टीत अखेरचा श्वास घेतल्याचा सर्वांना कळतं आणि सर्वांना मोठा धक्का बसतो. दिशा सालियन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर होती. दिशाच्या निधनाला जवळपास 5 वर्ष होत आली आहेत, पण तिच्या मृत्यूचं रहस्य अद्यापही गुलदस्त्यात आहे. कोणी म्हणत आहे दिशाने आत्महत्या केली, तरी कोणी म्हणत आहे की तिची हत्या करण्यात आली. आता पुन्हा दिशा सालियन प्रकरणाने डोकं वर काढलं आहे.

दिशा सालियन हिच्या वडिलांनी बुधवारी मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. जून 2020 मध्ये मुलीच्या गूढ परिस्थितीत झालेल्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सतीश म्हणाले की, याचिकेत उच्च न्यायालयाला उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, चार वर्षांनंतर संबंधित प्रकरण अचानक का चर्चेत आलं, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याला पडला. यामध्ये कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हा मुद्दा पुढे आला आहे.

हे सुद्धा वाचा

याचिकेत काय म्हटलं आहे?

दिशाच्या वडिलांनी जी याचिका दाखल केली आहे, त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख आहे. दिशा सालियनचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय कट रचण्यात आले… असं याचिकेत म्हटलं आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि यूबीटी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि इतरांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपावण्यात यावा… अशी मागणी केली आहे.

आदित्य ठाकरे का हैराण?

दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यामुळे आदित्य ठाकरे हैराण झाले आहे. दिशा सालियन हत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आहे. यावर खुद्द आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिला आहे. ‘गेल्या 5 वर्षांपासून माझी प्रतिमा मलीन उकरण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर प्रकरण कोर्टात आहे, तर मी उत्तर देईल… देशाच्या भल्यासाठी माझा लढा सुरूच राहील.’

विधानसभेत पोहोचलं प्रकरण

भाजप नेते अमित साटम यांनी याप्रकरणी सरकारकडे उत्तरं मागितली आणि इतकी वर्षे होऊनही तपासात प्रगती का झाली नाही, असा सवाल केला. त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात सांगितलं. दोषी व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, मग ती व्यक्ती कोणत्याही पार्टीची असली तरी काही हरकत नाही…

अखेर काय आहे प्रकरण?

दिशा सालियन प्रकरण हे हाय – प्रोफाईल प्रकरण आहे. 8 जून 2020 मध्ये दिशा हिचा मृत्यू झाला. मलाड येथील उच्चभ्रू इमारतीवरून पडल्यामुळे दिशाचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, पोलिसांनी सुरुवातीला दिशाची आत्महत्या ठरवून अपघाती मृत्यूचा अहवाल (ADR) दाखल केला. पण या घटनेनंतर अनेक प्रश्न समोर आले. त्यामुळे प्रकरण अधिक जटिल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरण बनलं आहे.

दिशा सालियन तिचा मंगेतर रोहन रायच्या अपार्टमेंटच्या 14व्या मजल्यावरून पडल्याचं सांगण्यात येत आहे. ती तिच्या मैत्रिणी आणि मंगेतरसोबत पार्टी करत असताना ही घटना घडली. आता याप्रकरणी पुढे काय होतंय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.