Disha Salian : दिशाच्या मृत्यूवेळी ते 44 फोन कॉल्स कोणामध्ये? राहुल शेवाळेंनी काय दावा केलेला?
Disha Salian : दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर बोलताना राहुल शेवाळे यांनी लोकसभेत एक भाषण केलं होतं. त्याचा संदर्भ याचिकेत देण्यात आला आहे. राहुल शेवाळे यांनी गंभीर आरोप केले होते.

पाच वर्षापूर्वीच्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. आदित्य ठाकरे यांचं नाव या प्रकरणात आलं आहे. यावेळी दिशा सालियानच्या वडिलांनी थेट हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. दिशा सालियानचे वडिल सतीश सालियान यांनी हाय कोर्टात केलेल्या याचिकेत शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या लोकसभेतील भाषणाचा दाखला दिला आहे. सतीश सालियान यांनी 200 हून अधिक पानांची याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ज्यांनी-ज्यांनी गंभीर आरोप केलेत, त्याचे संदर्भ आहेत. यात राहुल शेवाळे यांच्या लोकसभेतल्या भाषणाचा उल्लेख आहे.
दिशा सालियानच्या मृत्यूच्यावेळी आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 फोन कॉल्स झाल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला होता. आदित्य ठाकरेंवर कारवाईची मागणी केली होती. सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेत याच 44 फोन कॉल्सचा उल्लेख केला आहे. दिशा सालियानची आत्महत्या नाही, तर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असं गंभीर आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.
हाय कोर्टाची भूमिका महत्त्वाची
आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी राजकीय बळाचा वापरु करुन ज्यांच्यावर दबाव आणला हे प्रकरण मॅनेज केलं, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सुनावणीची तारखी निश्चित झाल्यानंतर या प्रकरणात हाय कोर्टाची भूमिका काय असणार? ते काय आदेश देणार? हे महत्त्वाच ठरणार आहे.
यावेळी याचिका इतकी महत्त्वाची का?
याआधी दिशा सालियान प्रकरणात त्रयस्थ व्यक्तींकडून आरोप झाले. राशिद खान पठाण यांनी याचिका दाखल करुन आरोपी बनवण्याची मागणी केली होती. पण यावेळी दिशा सालियानच्या वडिलांनी याचिका दाखल केल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त होतं. पाच वर्षात जे आरोप झाले, त्याचे सगळे संदर्भ याचिकेत देण्यात आले आहेत.