निकाळजे म्हणतात, आमदारांवर गुन्हा दाखल करा; भुजबळ-कांदे वादाला नवे वळण

आमदार कांदे यांच्याकडे माझ्याविरोधात एकही पुरावा नाही. भुजबळ यांच्याविरोधातील खटला मागे घ्यावा म्हणून मी धमकी दिल्याचे वृत्त पूर्णतः खोटे आहे, असा दावा सोमवारी अक्षय निकाळजे यांनी केला.

निकाळजे म्हणतात, आमदारांवर गुन्हा दाखल करा; भुजबळ-कांदे वादाला नवे वळण
सुहास कांदे आणि अक्षय निकाळजे.
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 5:31 PM

नाशिकः पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या वादाला आता एकदम नवे वळण मिळाले आहे. या वादात कांदे यांच्या तक्रारीवरून ओढला गेलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आता चक्क आमदार सुहास कांदे यांच्यावर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केलीय.

नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे म्हटले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्र देत तक्रार केली होती. मात्र, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले. या साऱ्या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आमदार कांदे आणि निकाळजे हे कुठलेही कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यास असमर्थ ठरले. हा चौकशी अहवाल पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी स्वतः या दोघांची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आमदार सुहास कांदे यांचा जबाब घेतला. आज सोमवारी अक्षय निकाळजे यांचा जबाब नोंदवण्यात आला.

अन्यथा खटला दाखल करणार

अक्षय निकाळजे यांनी जबाब दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमदार कांदे यांच्याकडे माझ्याविरोधात एकही पुरावा नाही. भुजबळ यांच्याविरोधातील खटला मागे घ्यावा म्हणून मी धमकी दिल्याचे वृत्त पूर्णतः खोटे आहे. मी आज पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची भेट घेतली. त्यांना सर्व माहिती दिली. त्यांनीही चांगले सहकार्य केले. शिवाय शुक्रवारपर्यंत या तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. माझे कांदे यांच्याशी फोनवर बोलणे झाले, पण ते आमच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीबाबत होते. धमकीचा तर प्रश्नच येत नाही. ते त्याचा पुरावा आणि कॉल रेकॉर्डिंगही देऊ शकले नाहीत. त्यांनी केलेल्या आरोपामुळे मला खूप भावनिक त्रास झाला. माझी प्रतिमा खराब झाली. त्यामुळे मी कांदे यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे. शिवाय नाशिक पोलिसांनीही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मी केली आहे. अन्यथा मी खटला दाखल करणार आहे, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (Dispute between Guardian Minister Chhagan Bhujbal, MLA Suhas Kande takes a new turn, Akshay Nikalje says file a case against MLA Kande)

इतर बातम्याः

Special Report: स्वातंत्र्याचं बेफाम वारं, अनंतराव नावाचा झंझावात अन् महाराष्ट्रातलं ‘मॅन्चेस्टर गार्डियन’

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी दिग्गजांच्या नावांचा विचार; उत्सुकता शिगेला!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.