नेत्यावर टीकेची झोड उठल्याने, कार्यकर्त्यांनी लावली भन्नाट आयडिया…
विविध संघटनांकडून छगन भुजबळ यांच्या विरोधात आंदोलनांची तयारी केली जात असतांना भुजबळांच्या समर्थनार्थ युवक राष्ट्रवादी सरसावली आहे.
नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर टीका होत असतांना त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहे. राष्ट्रवादीच्या युवक कॉँग्रेसच्या (NCP) शहराध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापलिकेच्या (NMC) शाळेत जात महापुरुषांच्या प्रतिमेचे वाटप केले आहे. नाशिक सातपुर परिसरात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिमा भेट देत भुजबळांनी केलेल्या विधानाचे एकप्रकारे समर्थन केले आहे. छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच भुजबळ यांच्यावर जहरी टीका होऊ लागल्याने राष्ट्रवादीने भुजबळ यांची बाजू लावून धरण्यासाठी एकप्रकारे महापुरुषांच्या प्रतिमा वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या सरस्वती आणि महापुरुषांचे फोटो या प्रकरणावरून थेट त्यांच्या भुजबळ फार्मवर भाजप निषेध आंदोलने करीत आहे.
विविध संघटनांकडून छगन भुजबळ यांच्या विरोधात आंदोलनांची तयारी केली जात असतांना भुजबळांच्या समर्थनार्थ युवक राष्ट्रवादी सरसावली आहे.
शाळा सुरु होताना सरस्वती शारदेचे पूजन होते त्याच सोबत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व्हावे याकरिता महापुरुषांचे फोटो वाटप करण्यात आल्याचे यावेळी शहराध्यक्ष खैरे यांनी म्हंटलय.
महापुरुषांनी केलेल्या कार्याचे प्रतिबिंब विद्यार्थ्यांच्या कृतीमध्ये उतरावे याकरिता प्रतिमेचे वाटप करण्यात आल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
युवक राष्ट्रवादीने छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचे समर्थन करत सातपूर येथील महापालिकेच्या शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे बाळा निगळ, जय कोतवाल, निलेश भंदुरे, रामदास मेदगे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.