राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार? जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे सहकार विभागाचे आदेश
कोरोनामुळे अनेक जिल्हा बँकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. काही जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपून 15 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी संपला आहे. सहकार विभागानं कोरोनामुळे 31 ऑगस्टपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत.
मुंबई : राज्यात कोरोना संकटामुळे सहकारी संस्था आणि जिल्हा बँकेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश सहकार विभागानं दिले आहेत. कोरोनामुळे अनेक जिल्हा बँकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. काही जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपून 15 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी संपला आहे. सहकार विभागानं कोरोनामुळे 31 ऑगस्टपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. (Order of Co-operation Department to start District Banks election Process)
जिल्हा बँकेच्या निवडणुका 31 ऑगस्टनंतर तातडीने घेण्यात याव्या यासाठी आतापासूनच प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हा बँकेची प्रारुप मतदार यादी तयार करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे सहकार विभागाने आताच आदेश काढले आहेत. कोरोनामुळे राज्यातील 31 पैकी 13 जिल्हा बँकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यात सातार आणि उस्मानाबाद जिल्हा बँकेचा समावेश आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलंय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळू शकतं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणूका होणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचं मलिक म्हणाले. काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. त्यामुळे काही ठिकाणी कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी – शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार असल्याचंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या :
Order of Co-operation Department to start District Banks election Process