BMC कर्मचाऱ्यांना दसऱ्या आधीच मिळणार दिवाळी बोनस; एवढी रक्कम मिळणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्युनिसिपल कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयास मान्यता दिली आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना( Mumbai Municipal Corporation ) दिवाळी बोनस( Diwali bonus) जाहीर झाला आहे. म्युनिसिपल कर्मचाऱ्यांना 22500 सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तर, आरोग्य सेविकांना एक वेतन सानुग्रह अनुदान म्हणून देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
अखेरीस म्युनिसिपल कर्मचाऱ्यांना 22500 सानुग्रह अनुदान देण्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्युनिसिपल कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयास मान्यता दिली आहे.
पालिकेच्या सुमारे एक लाख दोन हजार कर्मचाऱ्यांना या सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. BMC कर्मचाऱ्यांना यावर्षी दसऱ्याआधीच बोनस मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सह्याद्री अतिथी गृहावर बैठक पार पडली. म्युनिसिपल कर्मचारी संघटनांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत म्युनिसिपल कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत निर्णय घेण्यात आला.
दिवाळी सणानिमित्ताने महापालिका कर्मचाऱ्यांना 30 हजार रूपये इतके सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी मनसे म्युनिसिपल कर्मचारी सेनेने केली होती. तर, 25 हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा अशी BMC कर्मचाऱ्यांची मागणी होती.
बैठकीस खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार किरण पावसकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी संदिप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित.