लाडकी बहीण योजनेचा अर्ज करा डाऊनलोड, एका क्लिकवर मिळवा अर्ज

How To apply For Ladki Bahin Yojana: शासनाने या योजनेसाठी ‘नारीशक्ती दूत ॲप’ सुरु केले आहे. हे ॲप गुगल प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करता येणार आहे. योजनेच्या लाभासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. योजनेचा लाभ १ जुलैपासूनच मिळणार आहे. तसेच तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील हा अर्ज दाखल करता येणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज करा डाऊनलोड, एका क्लिकवर मिळवा अर्ज
ladki bahin yojana
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 7:16 AM

Ladki Bahin Yojana online Form 2024: महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार आणि प्रसार सुरु आहे. या योजनेचे विरोधकही स्वागत करत असताना महायुतीने विरोधाकांना कोंडीत पकडले आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनाचा अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आदिती तटकरे यांचा फोटो आहे. अर्जावर महायुतीच्या नेत्यांचे फोटो असल्यामुळे इतर पक्षातील नेत्यांची अडचण होणार आहे. कारण या योजनेसाठी इतर पक्षातील नेतेही शिबिर लावण्याची तयारी करत आहे. योजनेसाठी घरी बसून अर्ज करता येणार आहे.

अशी करता येईल प्रक्रिया

पात्र महिला योजनेसाठी घरी बसूनच ऑनलाइन अर्ज करु शकतात. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा पीडीएफ अर्ज डाऊनलोड करावा लागणार आहे. त्यात आपले नाव, पत्ता, बँकेची माहिती, आधार कार्ड नंबर आणि इतर सर्व गोष्टी भरव्या लागणार आहेत. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पुन्हा वेबसाइटवर अपलोड करावा लागणार आहे. बँके खाते देताना ज्या खात्यात तुम्हाला रक्कम हवी आहे, तेच खाते द्यावे लागणार आहे. त्यात बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव, बँक खाता क्रमांक, बँकेचा आयएपएससी कोड भरावा लागणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे आधार त्या बँक खात्याशी लिंक हवे.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे सुद्धा वाचा

योजनेसाठी ॲप सुरु

शासनाने या योजनेसाठी ‘नारीशक्ती दूत ॲप’ सुरु केले आहे. हे ॲप गुगल प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करता येणार आहे. योजनेच्या लाभासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. योजनेचा लाभ १ जुलैपासूनच मिळणार आहे. तसेच तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील हा अर्ज दाखल करता येणार आहे.

ॲपवरुन अशी भरा माहिती

  • ॲप डाऊनलोड झाल्यावर तुमची माहिती भरून प्रोफाईल तयार करा.
  • तुमचे नाव आणि इतर माहिती काळजीपूर्वक भरा.
  • योजनेसाठी अर्ज करणारी महिला कोणत्या कॅटेगिरीमध्ये ती माहिती भरा.
  • मुख्यमंत्री ‘लाडली बहीण योजना’ यावर क्लिक करून नाव, पत्ता, बँक खात्याचे डिटेल्स भरा.
  • अर्जदाराचा फोटो अपलोड करा.
  • त्यानंतर लागणारी कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर सबमिट करा.
  • अर्ज भरून पूर्ण झाल्याचा मेसेज तुम्हाला येतो.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे ही वाचा लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत नवीन खाती उघडावे लागणार का? प्रशासनाने दिले महत्वाचे स्पष्टीकरण

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.