ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका नको-डॉ. भागवत कराड

ओबीसीच्या ज्या ज्या मागण्या असतील त्याच्या समर्थनात मी राहणार आहे, ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. अशी प्रतिक्रिया भागवत कराड यांनी दिली आहे.

ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका नको-डॉ. भागवत कराड
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 4:07 PM

राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापाला आहे, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दणका देत, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना आरक्षण देण्याचा अध्यादेश रद्द केला आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून जोरदार राजकारण सुरू झालं, भाजप आणि महविकास आघाडीत इंपेरिकल डेटावरून टोलवाटोलवी होताना पहायला मिळाली. राज्यात सध्या होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत असल्याने निश्चितच त्याचा फटका ओबीसी समाजाला बसत आहे, जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते भागवत कराड यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे

ओबीसीच्या ज्या ज्या मागण्या असतील त्याच्या समर्थनात मी राहणार आहे, ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. अशी प्रतिक्रिया भागवत कराड यांनी दिली आहे. मला शिक्षण घेताना आरक्षणामुळेच मदत झाली, ओबीसीमुळे डाँक्टर झालो, तसेच ओबीसीमुळे राजकीय सुरुवात झाली असेही ते म्हणाले, एवढच नाही तर ओबीसी म्हणून ग्रामीण भागातून मी दिल्लीपर्यंत पोहचलो आहे, हे केवळ डॉ. बाबासाहेबांच्या घटनेमुळे अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

आज वंजारी समाजाचा कार्यक्रम आहे, त्याला भागवत कराड उपस्थिती लावणार आहेत, तसेच गुणवतांचा सत्कार सुद्धा करणार आहे, अशी माहितीही दिली. हा कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणावरून राज्यातलं राजकारण तापलं आहे, अशातच निवडणुका होत असल्याने, याचा फटका ओबीसी समाजाला बसत आहे, त्यामुळे निवडणुका रद्द कराव्यात अशी मागणी ओबीसी समाजातील अनेक घटकांकडून करण्यात आली आहे. तर ओबीसींचे आरक्षण भाजपमुळे गेल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे, तर राज्य सरकारच्या अपयशामुळे ओबीसी आरक्षण गेल्याची टीका भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.

Untimely Rain : उरली-सुरली आशा अवकाळीने मावळली, वादळी वाऱ्याने फळबागासह पीके आडवी झाली

मोबाईल इंटरनेटशिवाय पेमेंट करा, Paytm ची ‘टॅप टू पे’ सुविधा सुरु, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Nude photography exhibition| पुण्यात न्यूड फोटोग्राफी प्रदर्शन भरवले म्हणून छायाचित्रकाराला धमकी ; प्रदर्शन तात्काळ बंद अन्यथा……

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.