ED Raids Sridhar Patankar LIVE Updates : आगे आगे देखिए होता है क्‍या!, राणेंचा शिवसेनेला इशारा

| Updated on: Mar 22, 2022 | 10:09 PM

मुख्यमंत्र्यांच्या (Cm uddhav thackeray) मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे, ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. श्रीधर पाटणकर असे मुख्यमंत्र्यांच्या महुण्याचं नाव आहे, (Shridhar patankar) ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय

ED Raids Sridhar Patankar LIVE Updates : आगे आगे देखिए होता है क्‍या!, राणेंचा शिवसेनेला इशारा
मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर मोठी कारवाईImage Credit source: tv9

ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या (Cm uddhav thackeray) मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे, ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. श्रीधर पाटणकर असे मुख्यमंत्र्यांच्या महुण्याचं नाव आहे, (Shridhar patankar) ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय. यात जवळपास 6.45 कोटींच्या सपत्तीला (ED raid) टाळा लावण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय. राज्यात ईडी सुडाने कारवाई करत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून सतत महाविकास आघाडीकडून करण्यात यतोय. तर या कारवाईत केंद्रचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारमधील अनेक मंत्री ईडीच्या राडारावर आहेत. तसेच नवाब मलिक आणि अनिल देशमुख तर जेलवारीत गेलेत. त्यामुळे या कारवाईने हा संघर्ष आणखी वाढणार हे स्पष्ट झालं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Mar 2022 08:57 PM (IST)

    टीव्ही 9 कडील एक्स्लुझिव्ह माहिती

    निलांबरी प्रोजेक्ट-

    श्री साई बाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेडचा हा प्रोजेक्ट आहे

    एकूण किती फ्लॅट्स

    एकूण फ्लॅट्स 155 आहेत

    एकूण 24 माळ्याची इमारत आहे

    पहिल्या 6 माळ्यावर प्रत्येकी 4 फ्लॅट

    तर 7 माळ्यापासून प्रत्येकी 8 फ्लॅटस

    फ्लॅट्सची एकूण किंमत किती

    यामध्ये वन बीएचके आणि टू बीएचके फ्लॅट्स आहेत

    यात 1 बीएचके किंमत – 72 ते 75 लाख रुपये

    तर 2 बीएचकेची किंमत – 1 कोटी 20 लाख रुपये आहेत

    सहा महिन्यांपासून लोक येथे राहायला आले आहेत अजूनही काही फ्लॅट्स रिकामे आहेत जिथे लोक राहायला आले नाहीत पण विकले गेले आहेत

  • 22 Mar 2022 08:55 PM (IST)

    मुख्यमंत्री ठाकरे यांचे व्यवहार सासरवाडीकडे-निलेश राणे

  • 22 Mar 2022 08:54 PM (IST)

    महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीही इतिहासामध्ये झुकला नाही, झुकणारही नाही

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे परवाच भाषण त्याना इतकं झोंबले आहे अशी स्पष्ट प्रतिक्रिया आहे-अरविंद सावंत उद्धव ठाकरे यांनी मर्मावर बोट ठेवले सुडाने पेटलेली माणसं कोणत्या टोकावर जातात हे बघा पण एक लक्षात ठेवा महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीही इतिहासामध्ये झुकला नाही,  झुकणार ही नाही

  • 22 Mar 2022 08:50 PM (IST)

    आगे आगे देखिए होता है क्‍या!, राणेंचा शिवसेनेला इशारा

  • 22 Mar 2022 07:56 PM (IST)

    आदित्य ठाकरे Live

    ईडीच्या कारवाईवर माहिती घेऊन बोलू

    याबाबत मला आणखी काही माहिती नाही

    सविस्तर माहिती घेऊन बोलेन

    ईडीच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंचं पहिलं उत्तर

  • 22 Mar 2022 07:02 PM (IST)

    संजय राऊत काय म्हणाले?

    श्रीधर पाटणकर हे आमच्या परिवारातील आहेत,

    त्यांना कुठलीही नोटीस न देता कारवाई केली,

    आम्ही तुम्हाला झुकवू शकतो, हे दाखविण्याचं काम या कारवाई च्या माध्यमातून होत आहे,

    ज्या राज्यात सत्ता येऊ शकली नाही त्या ठिकाणी दबाव आणून कारवाई केली जात आहे,

    ही राक्षसी प्रवृत्ती आहे,

    भाजप सरकार आल्यापासून ईडी च्या कारवाई वाढल्या आहेत

    महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, तामिळनाडू या भागात कारवाया वाढल्या आहेत,

    भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात कारवाया केल्या वाढल्या आहेत,

    न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही,

    न्यायालय सुद्धा दबावाखाली आहे,

    तानाशाही सुरू आहे, चार राज्यात जिंकले म्हणजे तानाशाही असं होतं नाही,

    आम्हाला सर्वांना जेल मध्ये टाकून द्या,

    आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढायला तयार आहे

    ईडी सारख्या एजन्सी चा दुरुपयोग योग्य नाही,

    ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया या राजकीय सूडाच्या कारवाया सुरू आहे

    ईडी कडे, पंतप्रधान कार्यालयाकडे घोटाळ्याचे अनेक पुरावे आणि माहिती दिली आहे,

    मात्र बंदूक फक्त आमच्यावर रोखली जात आहे

    2007 प्रकरण सुद्धा काढली जात आहे

  • 22 Mar 2022 06:56 PM (IST)

    अनिल परब Live

    आपल्याकडून ही माहिती मिळतेय

    मी माहिती घेऊन बोलेन

  • 22 Mar 2022 06:54 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड लाईव्ह

    सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू

    अशा पद्धतीचे प्रयत्न चुकीचे

    तुम्ही आम्हाला डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ

    आम्ही कोसळणार नाही

    जनतेला कसं सुडाचे राजकारण सुरू आहे ते दिसतंय

    आम्ही सगळीकडे पाहुण्यांच्या स्वागताची सोय करून ठेवू

    अनिल देशमुखांच्या घरच्या नव्वद धाडी पडल्या

    काही मिळालं नाही यातून

  • 22 Mar 2022 06:53 PM (IST)

    प्रवीण दरेकर Live

    ज्या ठिकाणी जळतंय तिथेच धूर येतो

    ही कारवाई कायद्याच्या चौकटीत आहे

  • 22 Mar 2022 06:52 PM (IST)

    धनंजय मुंडे Live

    मीडियाने सर्व गोष्टी पुढे आणल्या पाहिजेत

    याने सरकारला फरक पडणार नाही

    ही कारवाई सुडाच्या भावनेतून होत आहे

  • 22 Mar 2022 06:50 PM (IST)

    रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर

    रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक

    ईडीनं या कंपनीच्या 11 फ्लॅट जप्त केल्या

    पाटणकरांच्या कंपनीला 30 कोटी रुपयांचं विनातारण कर्ज हमसफर डिलर कंपनीनं दिलं होतं

    हमसफर डिलर ही बनावट कंपनी असल्यााच ईडीचा आरोप

    हमसफर डिलर ही नंदकिशोर चतुर्वेदी यांची कंपनी

    नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्या बनावट कंपन्यांचे पैसे पाटणकरांच्या कंपनीत टाकण्यात आले

    नंदकिशोर आणि महेश पटेल यावर मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप

    मनी लॉन्ड्रिंगच्या 30 कोटी रुपयांमधूनच ठाण्यातल्या निलांबरी प्रोजेक्टमध्ये फ्लॅट्सचं बांधकाम केल्याचा ठपका

    एकूण 11 फ्लॅट्स जप्त, 11 फ्लॅट्सची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये

    2017 मध्ये महेश पटेल आणि चर्तुवेदीविरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल

  • 22 Mar 2022 06:46 PM (IST)

    शरद पवार Live

    तपास यंत्रणांचा गैरवापर हा देशासमोरील मोठा प्रश्न

    पाटणकरांवरील ईडीच्या कारवाईवर पवारांची पहिली प्रतिक्रिया

    ही आकडेवारी खाली असेल तर याच्यात राजकीय हेतुने त्रास देण्यासाठी ही कारवाई झाली

    ही ईडी आता गावागावात गेली आहे

    त्याला काही पर्याय आहेत

Published On - Mar 22,2022 6:40 PM

Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.