“डेंजरपणे हिशेब चुकते करण्याची खडसेंची ख्याती, गिरीश महाजनांना थेट आव्हान”

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपला जळगावात मोठं खिंडार पडणार असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जळगावचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

डेंजरपणे हिशेब चुकते करण्याची खडसेंची ख्याती, गिरीश महाजनांना थेट आव्हान
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 11:36 AM

जळगाव : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासंबंधी अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपला जळगावात मोठं खिंडार पडणार असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जळगावचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे. (Eknath Khadse NCP joining is challenge to Girish Mahajan in Jalgaon)

खरंतर, भाजपने गिरीश महाजनांना जाणीवपूर्वक मोठ केलं. यासाठी त्यांनी खडसेंना मागे सारत त्यांची प्रतिमा वाढवली. भाजपची सत्ता असताना महाजन यांना संकटमोचक असंही म्हटलं जाऊ लागलं. इतकंच नाही तर त्यांच्या नावाची चर्चा उपमुख्यमंत्रीपदापर्यंतही गेली होती. मात्र, ज्यांना संकटमोचक म्हटलं गेलं त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात अडकून राहावं लागेल. कारण, डेंजरपणे हिशेब चुकते करण्याची खडसेंची ख्याती आहे. त्यामुळे आता खडसेंच्या भाजप घटस्फोटानंतर गिरीश महाजन यांना थेट आव्हान असणार आहे, अशी प्रतिक्रिया जळगावातील ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

काँग्रेसला बिहार निवडणुका संपण्याची प्रतीक्षा, मोठ्या बदलाचे संकेत

खरंतर, भाजपची सत्ता गेल्याने अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. अशात मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी पक्षात अनेक नेत्यांना नाराज केलं. त्यामुळे आता खडसेंच्या जाण्यामुळे इतर नेत्यांनादेखील बळ मिळणार आहे. (Eknath Khadse NCP joining is challenge to Girish Mahajan in Jalgaon)

येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याआधी ते भाजपचा राजीनामा देऊन सर्व पदे सोडणार आहेत. राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त चुकल्यानंतर आता त्यांनी राजकीय सीमोल्लंघनासाठी नवी वेळ निश्चित केली आहे. खडसे यांच्या गोटात त्यादृष्टीने हालचालाही सुरु झाल्या आहेत. त्यासाठी खडसे समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू

एकनाथ खडसे यांना कृषी, जलसंपदा किंवा गृहनिर्माण? राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर खडसेंची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर खडसे यांना गृहनिर्माण, जलसंपदा किंवा कृषी अशा मोठ्या खात्याची जबाबदारी मिळण्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. दरम्यान, गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड तर जलसंपदा खातं जयंत पाटील यांच्याकडे आहे. आव्हाड आणि पाटील हे दोघेही राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. अशावेळी त्यांच्याकडून मोठ्या खात्याची जबाबदारी काढून ती भाजपमधून येणाऱ्या खडसेंना दिली जाणार का? असा प्रश्नही दबक्या आवाजात विचारला जात आहे.

(Eknath Khadse NCP joining is challenge to Girish Mahajan in Jalgaon)

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.