गिरीश महाजन यांना राजकारणात मी जन्माला घातलं, मात्र बाप विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही-एकनाथ खडसे

दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता तर खडसेंनी गिरीश महाजनांना राजकारण मी आणलं, मात्र देशात बाप विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही असे म्हणत जोरदार हल्ला चढवला आहे.

गिरीश महाजन यांना राजकारणात मी जन्माला घातलं, मात्र बाप विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही-एकनाथ खडसे
गिरीश महाजन- एकनाथ खडसे वादाचा दुसरा एपिसोड
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 4:06 PM

जळगाव : एकनाथ खडसे (Eknath khadse) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातलं राजकीय वैर संबंध महाराष्ट्राने पाहिलं आहे. दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता तर खडसेंनी गिरीश महाजनांना राजकारण मी आणलं, मात्र देशात बाप विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही असे म्हणत जोरदार हल्ला चढवला आहे. येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका (Nagar panchayat Elections 2022) होतायत. त्यापार्श्वभूमीवर महाजनांनी बैठक घेतली. त्यानंतर नाथाभाऊ पुन्हा आक्रमक झाले. आता जळगाव जिल्ह्यातून भाजप भुईसपाट होत चाललीय, असे शरसंधान त्यांनी यावेळी साधले. हा एपिसोड सकाळीच सुरू झाला असताना, दुपार होता होता आता या वादांचा दुसरा अंक सोमर आला आहे. नाथाभाऊंच्या या टीकेला गिरीश महाजन उत्तर देणार नाहीत असं कसं होईल, लगेचा खडसेंवर गिरी महाजनांनीही पलटावर केला आहे.

खडसे नेमकं काय म्हणाले?

आता गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना, अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, त्यांना राजकारणात जन्मला कोणी आणले. तिकीट कोणी दिले, त्यांना मोठे कोणी केले, गिरीश महाजन हे आता राष्ट्रीय नेते झाले, मात्र नाथाभाऊंनी त्यांना घडवले हे मात्र ते विसरत आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून नाथाभाऊ हा सर्वसामान्य असेल, असा टोला खडसेंनी लागावला आहे. तर खडसेंना उत्तर देताना, कोण आहेत ते खडसे? मी त्यांच्या बोलण्याला महत्व देत नाही, खडसे यांना काही महत्व राहिले नाही. लोकप्रतिनिधी नाहीत, काही नाहीत. त्यांना घरी बसून काहीतरी बोलावं लागतं म्हणून ते बोलतात. आम्ही काही त्यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही, असा खोचक टोला महजनांनी लगावला आहे.

आगामी निवडणुकांच्या तयारीवरून हल्लाबोल

आगामी काळातील जळगाव जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते गिरीश महाजनांनी जळगावात जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचा इशारा दिला. निवडणुका कधीही जाहीर होऊ द्या. मात्र, कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे समजताच एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली. खरे तर भाजपची नगरपालिका, नगपंचायत निवडणुकीवर ताकद दिसून आली. जळगाव जिल्ह्यात भाजप भुईसपाट होत चालली आहे. खरे तर ही आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची झलक आहे, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

औरंगाबाद : कन्नडमध्ये शिवजयंतीची मिरवणूक अडवली, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची पोलिसांशी खडाजंगी

Video : फिरकी बॉलवर नितेश राणेंची आक्रमक फटकेबाजी, उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद केला व्हिडीओ

Video: …असे चुX#@ देशात भरपूर,पत्रकारांनी सोमय्यांबद्दल विचारताच संजय राऊत भडकले, पाहा काय म्हणाले?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.