Uddhav Thackeray | ‘मातोश्रीच्या लिफ्टमध्ये अडकलो तर…’, आमदाराने सांगितलं न जाण्यामागच कारण
Uddhav Thackeray | बाळासाहेब ठाकरेंच्या वेळी मातोश्रीचे किती मजले होते? आता किती मजले झाले?. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमधून त्यांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदे गटावर, भाजपावर टीकेच आसूड ओढले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार पक्षातून बाहेर पडले. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी खेकड्यांनी धरण फोडलं, असं म्हटलं. त्यांच्या या टीकेला शिंदे गटातून प्रत्युत्तर देण्यात आलं.
आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने राजकीय विरोध बाजूला ठेऊन त्यांना अन्य पक्षातील नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिंदे गटातील सुद्धा एका आमदाराने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘चांगले आरोग्य लाभो’
महाडचे शिवसेना आमदार भरत शेठ गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांना शुभेच्या देतो. त्यांना चांगले आरोग्य लाभो असं गोगावले म्हणाले. याच भरतशेठ गोगावले यांच्या नावाची मंत्रिपदासाठी जोरदार चर्चा होती. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळेल असं बोलल जात होतं.
‘आम्ही बंडखोर नाही खुद्दार’
पण मंत्रिमंडळ विस्तारच रखडला आहे. पण त्यांच्या मतदारसंघासाठी अजित पवार यांनी चांगला निधी मंजूर करुन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण टीकेला उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले की, “आम्ही बंडखोर नाही खुद्दार आहेत बाहेर पडलो, तुम्ही बाहेर पडला नाहीत” ‘….तर आम्ही पण अडकून पडू’
“आम्हाला उद्धव ठाकरे यांची भीती वाटत नाही. पण आधी बाळासाहेब होते, तेव्हा तीन माळ्याची मातोश्री होती. आत्ता 8 माळ्याची नवी मातोश्री झालीय. आता 8 माळे आम्हाला चढायला जमणार नाहीत. लिफ्ट आहे पण ती मध्येच अडकली, तर आम्ही पण अडकून पडू, म्हणून तिथे जाणार नाही” असं भरत गोगावले म्हणाले.