ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडताच एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया काय? सोबत दोन महत्त्वाच्या व्यक्ती

एकनाथ शिंदे हे रुग्णालयात आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि मुलगा श्रीकांत शिंदे हे देखील होते. शिंदे यांचे कुटुंबिय रुग्णालयात त्यांच्यासोबत होते. एकनाथ शिंदे यांना सतत तापामुळे त्यांच्यावर अँटी बायोटिक औषधे सुरू आहे.

ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडताच एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया काय? सोबत दोन महत्त्वाच्या व्यक्ती
ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडताच एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 4:05 PM

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्ययमंत्री एकनाथ शिंदे यांना बरं वाटत नसल्याने ते आज दुपारी ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार करण्यात आले. एकनाथ शिंदे यांचं चेकअप केल्यानंतर ते काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडले. यानंतर ते रस्ते मार्गाने मुंबईच्या दिशेला रवाना झाले. एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. तसेच त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्या घशात संसर्ग झाल्याची माहिती आहे. शिंदे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. आजारपणामुळे त्यांनी साताऱ्यातील दरेगावात दोन दिवस मुक्काम केला. त्यानंतर ते ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी आराम करत आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल रात्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. त्यावेळी शिंदे यांना सलाईन लावली होती, अशी माहिती गिरीश महाजनांनी नंतर माध्यमांना दिली होती.

तपासणी झाल्यानतंर डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडले. एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांना केवळ तीन वाक्यात प्रतिक्रिया दिली. “माझी तब्येत चांगली होती. चेकअपसाठी आलो होतो. माझी प्रकृती उत्तम आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यानंतर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांची प्रकृती आता बरी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत रुग्णालयात दोन महत्त्वाच्या व्यक्ती

दरम्यान, एकनाथ शिंदे हे रुग्णालयात आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि मुलगा श्रीकांत शिंदे हे देखील होते. शिंदे यांचे कुटुंबिय रुग्णालयात त्यांच्यासोबत होते. एकनाथ शिंदे यांना सतत तापामुळे त्यांच्यावर अँटी बायोटिक औषधे सुरू आहे. शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र अशक्तपणा आणि ताप यामुळे त्यांनी दोन दिवसापासून आराम केला आहे. अशक्तपणा आल्याने त्यांना सलायान देखील लावण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांचा एक्स-रे आणि सिटीस्कॅन काढण्यात आला. डॉक्टरांकडून शिंदे यांच्या छातीत काही इन्फेक्शन आहे का? याची तपासणी करण्यात आली. थ्रोट इन्फेक्शन आणि कफ असल्याने एकनाथ शिंदे यांचे सिटी स्कॅन करण्यात आले. दरम्यान, एकनाथ शिंदे हे रुग्णालयात आले असताना ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंनगारे हे ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. माजी खासदार राहुल शेवाळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ज्युपिटर रुग्णालयात आले होते.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.