Eknath Shinde: कुणाचही नुकसान होणार नाही असाच निर्णय, आरेच्या जागेला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं उत्तर

कोणताही प्रकल्प असुद्या तो जनतेच्या हिताचा असेल आणि कोणाचं नुकसान होऊ देणार नाही, एवढेच उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. 

Eknath Shinde: कुणाचही नुकसान होणार नाही असाच निर्णय, आरेच्या जागेला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं उत्तर
कुणाचही नुकसान होणार नाही असाच निर्णय, आरेच्या जागेला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं उत्तरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 8:33 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री होताच पहिल्या दिवसांपासून कामचा धडका लावला आहे. आजही त्यांच्या रॅबिड बैठका पाहायला मिळाल्या. आज त्यांनी पावसातला संभाव्य धोका ओळखून आपत्ती व्यवस्थापनासंबंधी एक महत्वपूर्ण बैठक घेतली. मात्र या बैठकीनंतर एकनाथ शिंदे बाहेर आले आणि सर्वांच्या मनत जो प्रश्न होता, तोच त्यांना विचारला गेला. मेट्रोचं कारशेड (Metro Carshed) पुन्हा आरेमध्येचे नेण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तसं न करण्याची विनंती केली. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता. त्यांनी इतर प्रकल्पांसारखेच आरेतील मेट्रो प्रकल्पालाही सरसरकट उत्तर दिलं. कोणताही प्रकल्प असुद्या तो जनतेच्या हिताचा असेल आणि कोणाचं नुकसान होऊ देणार नाही, एवढेच उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.

आजच्या कॅबिनेटमधील महत्वाच्या घडामोड

सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे म्हणजे यंत्रणेतील सर्व लोक देखील सतर्क राहतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील समिती सभागृहात राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

अधिक दक्ष राहण्याची गरज

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आपत्तीमध्ये समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे. एनडीआरएफने त्याचप्रमाणे लष्कराने देखील गेल्यावर्षी पुराच्या परिस्थितीत चांगले काम केले आहे. कोणत्याही परिस्थितीत संपर्क आणि संवादाचा अभाव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयांमधील वॉर रुम यंत्रणा सज्ज राहून लोकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा. गेल्या वर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. विशेषत: नेहमी दरड कोसळणाऱ्या जागांव्यतिरिक्त नव्या ठिकाणी या दरडी कोसळल्या. त्यामुळे यंदा देखील अधिक दक्ष राहण्याची गरज आहे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

निवाऱ्याची व्यवस्था चोख व्हावी

धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठ्या पावसाच्या वेळेस तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवून त्या ठिकाणी त्यांना जेवण्याखाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकांनी घ्यावी. मी आणि उपमुख्यमंत्री 24 तास आपणा सर्वांसाठी उपलब्ध असून आपल्याला गतीमानतेने शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या पाहिजेत असेही मुख्यमंत्री म्हणाले. 275 मि.मी. पाऊस एका दिवसात पडूनही महानगरपालिकेने तसेच रेल्वेने सफाई तसेच पाणी तुंबणार नाही यासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे कोठेही मुंबईकरांना त्रास झाला नाही व वाहतुकही व्यवस्थित सुरळीत राहिली याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.