Shiv Sena Shinde Group Candidates List : शिंदे गटाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, अनेक मोठ्या नेत्यांच्या नावाचा समावेश

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत वरळी, अंधेरी पूर्व, रिसोड, पुरंदर, कुडाळ आदी मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे. मिलिंद देवरा (वरळी), मूरजी पटेल (अंधेरी पूर्व), भावना गवळी (रिसोड) यांसारख्या प्रमुख नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

Shiv Sena Shinde Group Candidates List : शिंदे गटाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, अनेक मोठ्या नेत्यांच्या नावाचा समावेश
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 9:29 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत अनेक मोठ्या नेत्यांची नावे आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अंधेरी पूर्वमधून मूरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रिसोडमधून भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कुडाळमधून निलेश राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचा सामना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात असणार आहे.

शिंदे गटाच्या दुसऱ्या यादीनुसार, अक्कलकुआमधून आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बाळापूरमधून बळीराम शिरसकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांचा सामना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्याविरोधात असणार आहे. रिसोडमध्ये भावना गवळी यांना संधी देण्यात आली आहे. भावना गवळी यांना काही दिवसांपूर्वी विधान परिषदेची संधी देण्यात आली होती. यामध्ये त्या जिंकून आल्या होत्या. पण लोकसभेला त्यांना संधी न मिळाल्याने त्या नाराज असल्याची माहिती होती. विधान परिषदेची संधी देवून एकनाथ शिंदे यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर भावना गवळी यांना रिसोडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विश्वनाथ भोईर आणि बालाजी किणीकर यांना पुन्हा संधी

हदगावमधून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड दक्षिणमधून आनंद तिडके पाटील यांना संधी देण्यात आली आहे. परभणीतून आनंद भरोसे, पालघरमधून राजेंद्र गावित, बोईसरमधून विलास तरे, बोईसरमधून विलास तरे, भिवंडी ग्रामीणमधून शांताराम मोरे, भिवंडी पूर्वमधून संतोष शेट्टी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातून विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भोईर हे येथील विद्यमान आमदार आहेत. तर अंबरनाथमधून ज्येष्ठ नेते तथा विद्यमान आमदार बालाजी किणीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विक्रोळीमधून सुवर्णा करंजे, दिंडोशीतून संजय निरुपम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अंधेरी पूर्वमधून मूरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चेंबूरमधून तुकाराम काले, वरळीतून मिलिदं देवरा, पुरंदरमधून विजय शिवतारे, कुडाळमधून निलेश राणे, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?.
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात.
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात.
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी.
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”.
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात.
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?.
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला.
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?.
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट.