एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, डॉक्टरांचं पथक दरे गावातील निवासस्थानी

एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या गावी दरेगावमधील निवासस्थानी असून त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांचं पथक त्यांच्या निवास्थानी रवाना झालं आहे.

एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, डॉक्टरांचं पथक दरे गावातील निवासस्थानी
एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 5:18 PM

मोठी बातमी समोर येत आहे. येत्या पाच डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी आपल्या मुळगावी साताऱ्यातील दरे गावात आले आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना त्रास जाणवू लागल्यानं ते आपल्या निवासस्थानीच विश्रांती घेत आहेत. एकनाथ शिंदे यांची प्रकती बिघडल्यानं डॉक्टरांचं पथक तपासणीसाठी त्यांच्या दरे येथील निवासस्थानी दाखल झालं आहे. मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदाची चर्चा सुरू असतानाच अचानक एकनाथ शिंदे हे आपल्या मुळगावी दरे येथे आल्यानं राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमंक काय म्हणाले सामंत? 

एकनाथ शिंदे नाराज असल्यानं ते आपल्या मुळगावी दरे येथे आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे, यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे हे नाराज आहेत म्हणून ते आपल्या गावी दरे येथे आले असं म्हणणं चुकीचं आहे.  मला वाटतं त्यांनी एका वाक्यात आपलं व्यक्तीमहत्त्व महाराष्ट्रासमोर आणलं आहे. मी नाराज होऊन रडणारा नाही तर लढणारा आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला धावपळीमुळे काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात. धावपळीमुळे त्यांना त्रास जाणवला असेल असं सामंत यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्रिपदासाठी अग्रही 

दरम्यान सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी अग्रही आहेत. ते गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. गृहमंत्रिपद दिलं तरच उपमुख्यमंत्रिपद स्विकारू अशी त्यांची भूमिका असल्याची माहिती समोर येत आहे. गृहमंत्रिपद जर एकनाथ शिंदे यांना मिळालं नाही तर उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेतील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे भाजप देखील गृहमंत्रिपदावरील आपला दावा सोडण्यास तयार नाहीये. त्यामुळे आता गृहमंत्रिपद नेमकं कोणाला मिळणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.