सत्तासंघर्षाच्या सुनावणीत नीरज कौल यांचा जोरदार युक्तिवाद; कौल यांच्या युक्तिवाद कोणते मुद्दे ? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असून तिसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशीही सुनावणी सुरू आहे. यामध्ये नीरज कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यावर उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे.

सत्तासंघर्षाच्या सुनावणीत नीरज कौल यांचा जोरदार युक्तिवाद; कौल यांच्या युक्तिवाद कोणते मुद्दे ? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 4:55 PM

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये ( Supreme court ) सुरू आहे. तिसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवसाच्या सुनावणीत जोरदार युक्तिवाद यावेळेला पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी आजच्या दिवशी युक्तीवात केला आहे. यावेळेला सरन्यायाधीश यांनी यावेळेला नीरज कौल ( ADV Neeraj Kaul ) यांनाही काही प्रश्न केले आहे. यावर नीरज यांनी आज केलेल्या युक्तिवादावर जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे. उज्ज्वल निकम यांनी यावेळी नीरज कौल यांचा युक्तिवाद आणि सरन्यायाधीश यांनी उपस्थित केलेले मुद्दे काय आहेत याचा उलगडा केला असून ही सुनावणी उद्या तरी संपणार नाही असा अंदाज व्यक्त केला आहे.

उज्ज्वल निकम टीव्ही 9 मराठीशी संवाद साधत असतांना म्हणाले, आज सर्वोच्च न्यायालयासमोर जी सुनावणी चालू होती या सुनावणीत एकनाथ शिंदे यांचे वकील कौल यांनी सरकार स्थापन झाला आहे.

हे बहुमताने स्थापन झाला आहे आणि बहुमताची चाचणी होण्याच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यामुळे ह्या सरकारची स्थापना झालेली आहे आणि आम्ही पक्षांतर केलेले नाही. असं त्यांचा सांगण्याचा प्रामुख्याने मुद्दा होता.

हे सुद्धा वाचा

परंतु आज सरन्यायाधीशांनी वेळोवेळी शिंदे यांच्या वकीलांना विचारणा केली. त्यावरून असे सर्वोच्च न्यायालयाला हे जाणून घ्यायचा आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये हे सत्तांतराचे नाट्य घडले आहे. याचे कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

27 तारखेला जो सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला होता, विशेषतः 16 आमदारांच्या अपात्रतेच्या विषयी, अपात्रतेची कारवाईला मुदत वाढवून दिली होती ती दिली नसती तर काय परिणाम झाला असता हे सर्वोच्च न्यायालयाला जाणून घ्यायचे असल्याचे म्हंटले आहे.

याशिवाय दूसरा एक मुद्दा सरन्यायाधीश यांनी नीरज कौल यांना विचारला आहे. राज्यपाल यांनी कशाच्या आधारावर एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेसाठी बोलावले. त्यानंतर सरकार अल्पमतात आल्यानंतर कोणती कृती केली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

हे संपूर्ण प्रकरण कधी सुरू झाले. त्यानंतर 21 जून ला जर सुरू झाले असेल तर पक्षांतर बंदी कायदा लागू होतो की नाही याबाबत विचार केला जाणार आहे. त्यात आता ठाकरे गटाच्या वकिलांनीही युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला आहे.

ही संपूर्ण परिस्थिती पाहता सत्तासंघर्षाची सुनावणी कधी संपेल हे सांगता येणं कठीण आहे. असं जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हंटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.