Eknath Shinde:सातारा जिल्ह्यातलं एकनाथ शिंदेंचं गाव, जिथे ना शाळा आहे, ना हॉस्पिटल, मात्र आहेत दोन हेलिपॅड..

महाबळेश्वरपासून ७० किलोमीटरवर असलेल्या, कोयना नदीच्या काठावर असलेल्या, दरे गावात अवघी ३० घरे आहेत. गावाच्या एका बाजूला जंगल आहे तर दुसऱ्या बाजूला कोयनेचे धरणक्षेत्र आहे

Eknath Shinde:सातारा जिल्ह्यातलं एकनाथ शिंदेंचं गाव, जिथे ना शाळा आहे, ना हॉस्पिटल, मात्र आहेत दोन हेलिपॅड..
Dare Eknath Shinde gaonImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 7:40 PM

मुंबई – राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर चर्चेत आहेत. शिवसेनेचे दोन तृतियांश आमदार आणि १० अपक्ष आमदार फोडल्यामुळे त्यांचे सध्याचे राजकीय वजनही महाराष्ट्राला कळले आहे. सध्या शिंदे आणि त्यांच्यासोबतचे बंडखोर आमदार हे गुवाहाटीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये (Guvahati )मुक्कामाला आहेत. तर राज्यात शिंदे आणि शिंदे समर्थक आमदारांना कुठे पाठिंबा मिळतोय, तर कुठे त्यांचा निषेध करण्यात येतोय, असे चित्र आहे. राज्यभरातून ठिकठिकाणी याच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक ठिकाणी शिवसेनेचे (Shivsena)नेते आणि कार्यकर्त्यांची नाराजीही पुतळे जाळून, हल्ले करुन व्यक्त होते आहे. अशा स्थितीत सातारा जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव दरे, याथील ग्रामस्थांनी एकनाथ शिंदे यांना बिनशर्थ पाठिंबा दर्शवला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद मिळेल, अशी आशा आहे.

एकनाथ शिंदेंचे गाव कुठे आहे

महाबळेश्वरपासून ७० किलोमीटरवर असलेल्या, कोयना नदीच्या काठावर असलेल्या, दरे गावात अवघी ३० घरे आहेत. गावाच्या एका बाजूला जंगल आहे तर दुसऱ्या बाजूला कोयनेचे धरणक्षेत्र आहे. गावातील अधिकांश घरांचे दरवाजे कुलुपबंद आहेत. या ठिकाणी राहणारे बहुतांशी मजूर आहेत. गावात उत्पन्नाचा काही ठोस स्रोत नसल्याने त्यांना मुंबई किंवा पुणे गाठावे लागते.

दरे गावात ना शाळा, ना हॉस्पिटल, मात्र आहे हेलिपॅड

दरे गावात ना शाळा आहे ना कोणते हॉस्पिटल. गावकऱ्यांना शिक्षणासाठी आणि आरोग्य सुविधांसाठी तपोला या गावावर अवलंबून राहावे लागते. हे गाव रस्त्याने ५० किमी अंतरावर तर नावेने १० किमी अंतरावर आहे. मात्र दरे गावात दोन हेलिपॅड आहेत. कारण शिंदे नेहमी हेलिकॉप्टरने गावी येत असतात. असे सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा

वाई-महाबळेश्वर मतदारसंघात येते दरे

सातारा लोकसभा मतदारसंघात आणि वाई-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात दरे गाव येते. हा सर्व परिसर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानण्यात येतो. सध्या तिथे राष्ट्रवादीचाच आमदार आहे. एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांना कधीही शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी लुभवण्याचे प्रयत्न केले नाहीत, असे स्थानिक सांगतात. स्थानिक पातळीवरील राजकारणातही त्यांनी कधी ढवळाढवळ केले नसल्याचेही सांगण्यात येते आहे. मात्र त्यांनी गावात काही विकास कामांना सुरुवात केल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. ते जो निर्णय घेतील, त्यांच्यासोबत गावकरी असतील, असे गावकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नशीबाने त्यांना एक दिवशी राज्याचे मुख्यमंत्री करावे, हा गावासाठी गौरव असेल, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.