Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचा षटकार, उपनेतेपदी बागुल; नाशिक महापालिकेची धुरा खांद्यावर

शिवसेनेच्या उपनेतेपदी सुनील बागुल यांची निवड करून शिवसेनेने एक महत्त्वाची खेळी खेळलीय. त्याचे कारण म्हणजे बागुल हे नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या उपमहापौर भिकुबाई बागुल यांचे पुत्र आहेत. तर बागुल त्यांचे चिरंजीव शंभू बागुल, हे सध्या भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आहेत. हे सारे पाहता माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यानंतर हे महत्त्वाचे पद शिवसेनेने बागुल यांच्याकडे सोपवल्याची चर्चा आहे.

फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचा षटकार, उपनेतेपदी बागुल; नाशिक महापालिकेची धुरा खांद्यावर
शिवसेनेच्या उपनेतेपदी सुनील बागुल यांची निवड करण्यात आलीय.
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 4:06 PM

नाशिकः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दौऱ्यापूर्वीची नाशिकमध्ये (Nashik) शिवसेनेने (Shiv Sena) षटकार मारला आहे. नाशिकच्या विद्यमान उपमहापौर भिकुबाई बागुल यांचे पुत्र आणि भाजपमधून पुन्हा स्वगृही परतलेले सुनील बागुल यांच्यावर शिवसेनेने उपनेतेपदाची जबाबदारी टाकलीय. विशेष म्हणजे बागुल यांचे चिरंजीव शंभू बागुल हे सध्या भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आहेत. नाशिकला माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यानंतर हे महत्त्वाचे पद मिळाले आहे. आता बागुल यांच्यावर खांद्यावर आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. सध्या महापालिकेत शिवसेना विरोधीपक्ष म्हणून भूमिका निभावतोय. गेल्या निवडणुकीत पक्षाचे 35 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, यंदा कमीत कमी 67 जागा मिळवल्यास पक्ष साध्या बहुमताने तरी सत्तेत येऊ शकतो.

एक वर्तुळ झाले पूर्ण

सुनील बागुल हे शिवसेनेचे निष्ठावान सैनिक आहेत. त्यांनी आयुष्यातील सर्वाधिक काळ शिवसेनेत घालवला. मात्र, पक्ष आणि त्यांच्यात दुरावा वाढला. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस आणि तदनंतर भाजपकडे वळवला. मात्र, या दोन्ही ठिकाणे ते म्हणावे तसे रमले नाहीत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे साधारणतः वर्षाच्या अगोदर बागुल पुन्हा स्वगृही परतले. त्यामुळे त्यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार, याची उत्सुकता शिवसैनिकांमध्ये होती. अखेर ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाय महापालिकेवर भगवा फडकावण्याची जबाबदारीही बागुल यांच्या खांद्यावर टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. ही महत्त्वाची खेळी आहे.

उद्योगातही छाप

बागुल यांनी शिवसेनेत असताना महानगरप्रमुख तसेच विविध पदे भूषविली आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेचे उमेदवारही होते. नाशिकच्या उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे नाव म्हणूनही त्यांची ओळख आहे. सध्या ते श्रमिक सेना तसेच रिक्शा, टॅक्सी चालक युनियन व कामगार संघटनांचे नेतृत्व करतायत. पंचवटी परिसरातील रामवाडी भागातून त्यांच्या घरातील सदस्य सातत्याने महापालिकेत नगरसेवक आहेत. शिवाय शिवसेनेत दीर्घकाल घालवला असल्याने सगळ्या नाड्या त्यांना ठाऊक आहेत. हे पाहता त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

भाजपला जड जाणार

उपनेतेपदी बागुलांची झालेली निवड भाजपला जड जाणार आहे. कारण बागुल स्वतः भाजपमध्ये होते. तिथले सारे छक्के-पंजे त्यांना माहित आहेत. शिवाय त्यांच्या मातोश्री आणि सुपुत्रही सध्या भाजपमध्ये आहेत. पुढे कदाचित ते सुद्धा शिवसेनेच्या वाटेवरून चालू शकतात. त्यांनी काही राष्ट्रवादीत घालवला आहे. हे सारे पाहता या निवडीच्या गणिताचा अर्थ लावता येईल. त्यामुळे भाजपच्या समोरच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.