भाजपनं मागासवर्गीय सोयी सुविधा संपवल्या : नितीन राऊत

भाजपने मागासवर्गीयांच्या सोयी-सुविधा संपवल्या, असा घणाघाती आरोप राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.

भाजपनं मागासवर्गीय सोयी सुविधा संपवल्या : नितीन राऊत
नितीन राऊत
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 2:31 PM

नागपूर : भाजपने (BJP) मागासवर्गीयांच्या सोयी-सुविधा संपवल्या, असा घणाघाती आरोप (Nitin Raut Criticize BJP) राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. ते आज नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर अनेक टिकास्त्र सोडले. त्याशिवाय, काँग्रेसने (Congress) सत्तेत असताना जनहिताचे अनेक निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले (Nitin Raut Criticize BJP).

केंद्रातील भाजप सरकारने दलित, मागास समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला : नितीन राऊत

2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवलं होतं. संविधानाची शपथ घेऊन ते पंतप्रधान झाले. धर्मनिरपेक्षता या शब्दाला मोदींनी पंथनिरपेक्षता असं करण्याचा प्रयत्न केला. केंद्रातील भाजप सरकारने अनुसुचीत जाती जमातीच्या लोकांच्या जीवन अधोगतीकडे नेली. विशिष्ट वर्ग सोडल्यास भाजप सरकारच्या धोरणांचा सामान्यांना फटका बसला, असा आरोप नितीन राऊतांनी केला.

लोकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी मुस्लीम हिताचा निर्णय घेतला. भाजपचे नेते वरवर विकासाच्या बाता मारत असतात, पण त्यांनी मागास, दलित समाजाच्या विकासाचा मार्ग रोखला, दलित प्रशासकीय अधिकारी सचिव व्हायला लागले ते भाजपला आवडलं नाही. एससी समाजातील शिक्षित झाले, त्यांना रोजगार मिळून नये, असा भाजपचा कार्यक्रम, केंद्रातील भाजप सरकारने दलित, मागास समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला, असंही ते म्हणाले

मराठा समाजाला आरक्षण देताना भाजपने खुप गवगवा केला, तत्कालीन भाजप सरकारने योग्य पद्धतीनं मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडली नाही. शिष्यवृत्ती थांबवली, मागासवर्गीय आणि दलित समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, सरसंघचालकांनी आरक्षणावर पुनर्विचार व्हावा, असं वक्तव्य केलं होतं

महाविकास आघाडी सरकारने सर्व समाजाच्या विकासाचे मुद्दे हाती घेतले : नितीन राऊत

महाविकास आघाडी सरकारने सर्व समाजाच्या विकासाचे मुद्दे हाती घेतले. मागास आणि दलीत समाजाच्या विकासाची पावलं महाविकास आघाडी सरकारने उचलले. याबाबतच सोनिया गांधी (Sonia Gandhi Letter To CM) यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं.

सोनिया गांधी यांचे क्रांतीकारी : नितीन राऊत

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम ठरला. सोनिया गांधी यांचे क्रांतीकारी पत्र आहे. या पत्राने काँग्रेसचा आगामी निवडणूकीत काय अजेंडा असेल हे दिसून येते.

सोनिया गांधी यांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

– लोकसंख्येनुसार मागास आणि दलीत वर्गासाठी निधीचं वाटप

– मागास आणि दलीत युवकांना सरकारी कंत्राट मिळावे

– सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुशेष भरताना कालबद्ध कार्यक्रम राबवावा

– शिक्षण तंत्रशिक्षण किंवा कैशल्यविकास कार्यक्रमाच मागास आणि दलीत युवकांचे कौशल्यविकास करावे

सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्रातील सुचना मागास, दलित समाजाच्या हितासाठी आवश्यक आहेत. सोनिया गांधी यांच्या सूचना ठाकरे सरकारला मार्गदर्शक ठरणार आहेत.

अनुसूचित जाती, जमातीच्या वर्गाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी हे पत्र : नितीन राऊत

राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वःताकडे बघावं, सर्वात जास्त ॲट्रॅासीटीच्या घटना अहमदनगर जिल्ह्यात आहेत. कॅामन किमान प्रोग्राम ठरला होता. वरिष्ठ मंडळी नेहमी आठवण करुन देतात. सोनिया गांधींच्या पत्राने ठाकरे सरकारला ती आठवण करुन दिली. राज्यात सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं. त्यामुळे किमान समान अजेंड्यावर काम करत असताना अनुसूचित जाती, जमातीच्या वर्गाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी हे पत्र लिहलं. शरद पवार (Sharad Pawar) सुद्धा असे पत्र लिहत असतात, त्यामुळं याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज नाही, असंही राऊतांनी स्पष्ट केलं (Nitin Raut Criticize BJP).

13 महिन्यात किमान समान कार्यक्रमावर काय केलं?

राज्यावर कोरोनावर संकट आहे, राज्य सरकारने कोरोना महामारित चांगलं काम केलं. कोरोना काळात ठाकरे सरकारने चांगलं काम केलं. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालं ते हाताळण्यात राज्य सरकारने चांगलं काम केलं. हे काम किमान समान कार्यक्रमावर आधारीतच आहे. भाजपने दलित आदिवासींच्या हिताचे कार्यक्रम बंद केले होते, त्यामुळे सोनीया गांधी यांना पत्र लिहिण्याची वेळ आली.

शिवसेनेला या पत्राने टेन्शन आलेलं नाही : नितीन राऊत

शिवसेनेला या पत्राने टेन्शन आलं नाही, पण कुठतरी गांभीर्य आलंय. पुढील बजेटमध्ये यावर विचार होईल. सोनिया गांधीच्या पत्रावर कोअर कमिटीत चर्चा होईल. कोअर कमिटीत नवाब मलिक नाही. अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील आहेत, त्यात यावर विचार होईल.

Nitin Raut Criticize BJP

संबंधित बातम्या :

शिवसेना दिलेला शब्द पाळत नाही, एकहाती निर्णय घेते; काँग्रेस नेत्याची खरमरीत टीका

महाविकास आघाडी सरकार गॅसवर; आशिष शेलार यांचा दावा

सोनियांचा लेटरबाँब नाही, संवाद; पत्रावर तिन्ही पक्षांची सारवासारव?

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.