कोरोना संसर्ग कमी झाला तरी गाफील राहू नका, खबरदारी घ्या, शंभूराज देसाईंच्या सूचना

संसर्ग कमी झाला असला तरी गाफील राहून चालणार नाही. कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजनांवर यापुढेही भर देऊन कोरोना चाचण्यांची संख्या कमी न होऊ देता, त्या कायम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेत. Shambhuraj Desai

कोरोना संसर्ग कमी झाला तरी गाफील राहू नका, खबरदारी घ्या, शंभूराज देसाईंच्या सूचना
shambhuraj desai
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 10:02 PM

वाशिम: जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने 1 जूनपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आलेत. कोरोना संसर्गात घट झाली असली तरी खबरदारी घेणे आवश्यक असल्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्यात. संसर्ग कमी झाला असला तरी गाफील राहून चालणार नाही. कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजनांवर यापुढेही भर देऊन कोरोना चाचण्यांची संख्या कमी न होऊ देता, त्या कायम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिलेत. जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती आणि खरीप हंगामाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आज 1 जून रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. (Even If The Corona Infection Is Reduced, Don’t Be Ignorant, Be Careful Says Shambhuraj Desai)

सात दिवसांत कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, गेल्या सात दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून, जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्बंध शिथिल करून सर्व दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली. त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच रुग्ण संख्येत घट झाली असली तरी कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

तालुकास्तरावर स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावा, शंभूराज देसाईंचं विधान

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात आलाय. गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. याविषयी संनियंत्रण करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावेत, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यावेळी म्हणाले. तसेच जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे पालक गमविलेल्या अनाथ बालकांची माहिती संकलित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.

तालुकास्तरावर स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावेत

खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते यांची टंचाई भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे उपलब्ध करून देण्याची मोहीम अधिक गतिमान करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या मोहिमेतून थेट बांधावर खते, बियाणे देण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ 12 वरून 4 ते 5 टक्क्यांपर्यंत खाली

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यातील कोरोनाविषयक सद्यस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या सात दिवसांमध्ये जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ 12 वरून 4 ते 5 टक्क्यांपर्यंत खाली आला. तसेच दैनंदिन रुग्ण संख्या 100 ते 150 च्या दरम्यान असून, जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजारांच्या आतमध्ये आली. जिल्ह्यात सध्या बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला जात असून, सध्या जवळपास 78 टक्के रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात सुमारे 23 हजार शेतकऱ्यांना 209 कोटी पीक कर्ज वितरीत करण्यात आले होते, यंदा आतापर्यंत 64 हजार 49 शेतकऱ्यांना 517 कोटी 51 लक्ष पीक कर्जाचे वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला, आज 831 रुग्ण सापडले

Even If The Corona Infection Is Reduced, Don’t Be Ignorant, Be Careful Says Shambhuraj Desai

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.