AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बनावट पनीर विकाल तर अडकाल, फसवणूक करणाऱ्यांना बसणार दट्ट्या

ग्राहकाच्या हिताचे रक्षण करण्याकरिता रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स व फास्ट फूड आस्थापनांवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. यामध्ये पनीर ऐवजी चीन ॲनालॉगचा वापर होत असल्यास त्याबाबतच्या घटक पदार्थांची माहिती इलेक्ट्रॉनिक ऑर्डर मशीन, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, मेनू कार्ड इत्यादींवर नमूद करणे आवश्यक आहे.

बनावट पनीर विकाल तर अडकाल, फसवणूक करणाऱ्यांना बसणार दट्ट्या
बनावट पनीर विकल्यास कारवाईImage Credit source: TV9 Telugu
| Updated on: Apr 19, 2025 | 12:43 PM
Share

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याची पत्नी गौरी खानचं ‘टोरी’ हे आलिशान हॉटेल नुकतंच बरेच चर्चेत आलं होतं. या हॉटेलमध्ये भेसळयुक्त जेवण मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. एका इन्फ्लुएन्सरने, नुकतंच मुंबईतील अनेक सेलिब्रिटींच्या हॉटेलमध्ये जाऊन पदार्थांचं परीक्षण केलं होतं. आणि त्यावेळी गौरी खानच्या हॉटेलमध्ये भेसळयुक्त पनीर मिळत असल्याचा दावा इन्फ्लूएन्सरने केला होता, यामुळे हे हॉटेल आणि बनावट पनीरचा मुद्दा बराच चर्चेत आला होता.

पनीर हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना पनीरच्या वेगवेगळ्या डिशेस आवडतात. त्यामुळे पनीरला नेहमी मोठी मागणी असते. मात्र काही हॉटेलमध्ये ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे दिसून येत आहे. गौरी खानच्या हॉटेलमध्येही भेसळयुक्त स बनावट पनीर असल्याचा प्रकार समोर आला होता. बनावट पनीर किंवा पनीर ऐवजी चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. म्हणूनच एफडीएने आता आपला मोर्चा पनीर विक्रेत्यांकडे वळवला असून ग्राहकांची फसवणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ग्राहकांची फसवणूक करणार्‍यांचे रद्द होणार परवाने

बनावट पनीरची विक्री रोखण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात आली आहे. पनीर ऐवजी चीज ॲनालॉगच्या होणार्‍या गैरवापराविरोधात कारवाई करण्याचे सक्त आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत. आपण जे अन्न खातो, त्याबद्दल योग्य निर्णय व निवड करण्यासाठी ग्राहकांना अन्न पदार्थांतील घटक पदार्थांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. अन्न व सुरक्षा मानके (लेबलिंग आणि डिस्प्ले नियमन) 2020 मधील प्रकरण ३ मधील नियमन ९ (६) नुसार अन्न व्यावसायिकाने ग्राहकांना अन्न पदार्थांची विक्री करताना पोषण संबंधित माहिती तसेच त्यातील घटकांची माहिती व संदेश प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. तसे न करता ग्राहकांची फसवणूक केली जात असेल तर आता एफडीए कठोर कारवाई करणार आहे.

फसवणूक केल्यास बसणार दट्ट्या

ग्राहकाच्या हिताचे रक्षण करण्याकरिता रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स व फास्ट फूड आस्थापनांवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. यामध्ये पनीर ऐवजी चीन ॲनालॉगचा वापर होत असल्यास त्याबाबतच्या घटक पदार्थांची माहिती इलेक्ट्रॉनिक ऑर्डर मशीन, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, मेनू कार्ड इत्यादींवर नमूद करणे आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर सर्व संबंधित अधिकार्‍यांना व्यावसायिकांचे खरेदी बिल्स तपासून कोणतीही फसवणूक किंवा दिशाभूल आढळल्यास सखोल तपासणी करुन अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नियम व नियमन 2022 तसेच अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यावसायिक परवाना व नोंदणी) नियमन २०११ मधील तरतुदींनुसार तात्काळ परवाना निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोणत्याही प्रकारे ग्राहकांची फसवणूक होणार नाही व ते खात असलेल्या अन्नाबाबत त्यांना अवगत केले जाईल याची सुनिश्चिती एफडीए करणार आहे. तसे न झाल्यास गंभीर कारवाई केली जाणार आहे. या आदेशामुळे बनावट पनीर विकणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांना वठणीवर आणण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.