मोठी बातमी ! रत्नागिरीतील रिफायनरी विरोधातील आंदोलन 3 दिवसांसाठी स्थगित, कारण काय?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय असलेला बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भातील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले असून आंदोलकांनी घोषणा केली आहे.

मोठी बातमी ! रत्नागिरीतील रिफायनरी विरोधातील आंदोलन 3 दिवसांसाठी स्थगित, कारण काय?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 6:06 PM

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू आहे. माती परीक्षण केले जात असताना स्थानिक शेतकऱ्यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. तेच आंदोलन 3 दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी बारसू येथे  शेतकरी आणि पोलीस यांच्यामध्ये आंदोलनाच्या दरम्यान झटापट झाल्याचे देखील बघायला मिळाले आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे. खरंतर हा प्रकल्प व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी कळविले होते.

उद्धव ठाकरे यांनी भूमिका बदलली म्हणून बारसू रिफायनरी प्रकल्प राज्यात राजकारणाचा मुद्दा देखील बनला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेवर बोट ठेवत घणाघाती टीका केली आहे.

त्यावरूनच आजच्या दिवशी खासदार विनायक राऊत हे बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधासाठी मोर्चा काढणार होते. त्याचपूर्वी खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी थेट माती परीक्षण सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेत पोलिसांचा विरोध जुगारून आक्रमक पवित्रा घेतला होता.

हे सुद्धा वाचा

यामध्ये आंदोलन आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने काही नागरिकांना दुखापत झाल्याचे देखील समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर माती परीक्षण तीन दिवसांसाठी थांबवा आम्ही चर्चेला तयार आहोत अशी भूमिका स्पष्ट करत आंदोलकांनी तीन दिवसांसाठी बारसू रिफायनरीच्या विरोधातील आंदोलन स्थगित केले आहे.

खरंतर सरकारच्या वतीने बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोबत बैठकीसाठी सरकार तयार असल्याचा निरोप देखील दिला होता. स्थानिक पातळीवर प्रशासकीय अधिकारी आंदोलन शेतकऱ्यांशी संवाद देखील साधत आहे. मात्र संवाद साधत असताना तोडगा न निघाल्याने आंदोलक अधिकच आक्रमक होत आहे.

याच पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही आंदोलकांना सरकार चर्चेसाठी तयार असल्याचा निमंत्रण दे आंदोलन थांबवा असं आवाहन केलं होतं. त्यामध्ये आता आंदोलन स्थगित झाले असून तीन दिवसांत काही तोडगा निघतो का? सरकारला आंदोलन कायमचे थांबविण्यात यश मिळते का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.