आमदार संजयमामा शिंदेंविरोधात शेतकरी आक्रमक, पुण्यातील पंजाब बँकेवर अर्धनग्न आंदोलन करत मागितली भीक!

आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करुन कोट्यवधी रुपयांचं कर्ज उचलल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर करमाळ्यातील शेतकऱ्यांनी आज पंजाब नॅशनल बँकेवर अर्धनग्न होक भीक मांगो आंदोलन केलं.

आमदार संजयमामा शिंदेंविरोधात शेतकरी आक्रमक, पुण्यातील पंजाब बँकेवर अर्धनग्न आंदोलन करत मागितली भीक!
आमदार संजय शिंदे यांच्याविरोधात शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 2:40 PM

पुणे : करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करुन कोट्यवधी रुपयांचं कर्ज उचलल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर करमाळ्यातील शेतकऱ्यांनी आज पंजाब नॅशनल बँकेवर अर्धनग्न होक भीक मांगो आंदोलन केलं. संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज उचलल्याचा प्रकार समोर आलाय. त्याचबरोबर उचललेलं कर्ज वेळेत न भरल्यामुळे बँकेनं शेतकऱ्यांनाच नोटीस बजावल्या. या प्रकरणात न्याय न मिळाल्यानं करमाळ्यातील शेतकऱ्यांनी पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेच्या कॅम्पमधील विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केलं. (Farmers protest against Punjab National Bank in Pune)

न्यायासाठी शेतकऱ्यांने अनेक दरवाजे ठोठावले. मात्र कुठूनही न्याया मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांना बॅक मॅनेजर यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान मागितलेल्या भीकेच्या स्वरुपातील पैसे बँक आणि आमदार संजयमामा शिंदे यांना पाठवले. 2013 पासून आतापर्यंत कारखाना आणि बँकेची कोणतीही नोटीस शेतकऱ्यांना आली नाही. मात्र, 29 मे नंतर पंजाब नॅशनल बँकेच्या वकिलांकडून पोस्टाने नोटीस पाठवून कर्जाची रक्कम 2 मे पर्यंत भरावी, अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्या नोटिशीत देण्यात आलाय.

2013 साली खतं देतो म्हणून शेतकऱ्यांची कागदपत्रे घेतली

संजयमामा शिंदे यांनी आपल्या विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगाव, ता. माढा या साखर कारखान्याद्वारे शेतकऱ्यांना 2013 साली खत देतोना म्हणे कागदपत्रे गोला केली. संबंधित शेतकऱ्यांना खत न देता त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन पुण्यातील कोथरुड परिसरात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून शेतकऱ्यांच्या नावे 22 कोटी 11 लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचं समोर आलंय.

दीड हजार शेतकऱ्यांच्या नावे 22 कोटी उचलल्याचा आरोप

कारखान्याचे चेअरमन आणि संबंधित अधिकारी तसेच पंजाब नॅशनल बँकेचे त्यावेळेचे शाखाधिकारी आणि आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आमदार संजयमामा शिंदे यांनी खत देतो म्हणून दीड हजार शेतकऱ्यांच्या नावावर तब्बल 22 कोटी उचलले. तसंच यशवंत राहकारी साखर कारखाना, थेऊर, जि. पुणे यांच्या मालकीची 100 एकर जमिन खरेदी केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या नावावर उचललेल्या रकमेतूनच 2 ठिकाणी फार्महाऊसची निर्मिती केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्यांना न कळविता कर्ज काढून आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर 2 ते 3 लाखाचं कर्ज आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आमदार संजय शिंदे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याच्या मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आलीय.

संबंधित बातम्या :

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या; राष्ट्रवादी पुरस्कृत आमदाराची मागणी

VIDEO | रॉयल एनफिल्डच्या शोरुमचे शटर वाकवून आत शिरला, बदलापुरात धाडसी चोरी

Farmers protest against Punjab National Bank in Pune

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.