फ्लाईंग क्लब विदर्भातील तरुणांना फायदा देणारा; आदित्य ठाकरेंकडून विकासासाठी प्रयत्न

फ्लाईंग क्लब विदर्भातील तरुणांना आणि नवीन वैमानिकाना मोठा फायदा देणारा ठरणार आहे. या क्लबच्या विकासासाठी आम्हीसुद्धा प्रयत्नशील असून त्याला उपयुक्त बनविण्यासाठी आणखी प्रयत्न करणार असे अश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

फ्लाईंग क्लब विदर्भातील तरुणांना फायदा देणारा; आदित्य ठाकरेंकडून विकासासाठी प्रयत्न
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 10:10 PM

नागपूरः नागपुरातील बंद असलेला फ्लाईंग क्लब (Flying Club) पुन्हा पुनर्जीवित करण्यात आला आहे. आज त्याचा शुभारंभ (Launch) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. विदर्भाच्या विद्यार्थ्यांसाठी हा क्लब महत्वाचा ठरणार असून याचा मोठा फायदा होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. नागपुरात अनेक वर्षापासून असलेले फ्लाईंग क्लब बंद पडले होत, त्याला आता पुनर्जिवित करण्यात आले आहे. आणि त्याची आता नव्याने सुरवात करुन आदित्य ठाकरे यांनी त्याचा आज शुभारंभ केला.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले, की हा फ्लाईंग क्लब विदर्भातील तरुणांना आणि नवीन वैमानिकाना मोठा फायदा देणारा ठरणार आहे. या क्लबच्या विकासासाठी आम्हीसुद्धा प्रयत्नशील असून त्याला उपयुक्त बनविण्यासाठी आणखी प्रयत्न करणार असे अश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी फ्लाईंग क्लबच्या माध्यमातून नवी संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सरकारकडून जी मदत देता येईल ती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल असे मतही त्यांनी व्यक्त केले.

निधी उपलब्ध करुन दिला म्हणून टीका

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी विदर्भातील ग्रामीण भागातील विद्यार्थाना सुद्धा पायलट होता यावं यासाठी हे क्लब महत्वाचं ठरणार आहे. यामुळे महाज्योति अंतर्गत यासाठी आम्ही निधी उपलब्ध करुन दिला म्हणून आमच्यावर जोरदार टीका करण्यात आली. मात्र ही टीका यासाठी सहन केली आहे की, त्याचा फायदा विदर्भातील युवकांना होणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, भविष्यात फ्लाईंग क्लबचा उपयोग येथील विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यासाठी केला पाहिजे असं मतही मान्यवरांनी व्यक्त केले.

तर पालक मंत्री नितीन राऊत यांनी या क्लबसाठी अनेक प्रयत्न करून त्याला नव्याने सुरवात केली असल्याचे सांगितले सोबतच आपण याच क्लब चे विद्यार्थी असून त्याचा फायदा आता विदर्भातील विद्यार्थ्यांना होणार आहे.

संबंधित बातम्या

ऊर्जा आणि पर्यावरण विभाग आमने सामने; नागपुरातील अ‍ॅशंबडचा वाद चिघळणार, आदित्य ठाकरे-नितीन राऊतांच्या निर्णयाकडे लक्ष

शाळा बंद असल्याने बालविवाहाचं प्रमाण वाढलं, नागपुरात 11 प्रकरणं उघडकीस; महिला कल्याण विभागाची महत्त्वाची भूमिका

Video | अकोल्यातील पहिलीतील परिधीला गिरक्या घेताना बघीतलं का?, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद..!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.