शेतकऱ्याकडे लाच मागणारा वनरक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात; शेतीच्या बांधबंदिस्तासाठी मागितली 10 हजारची लाच

शेतावरील बांधबंदिस्तासाठी परवानगी मागितल्यानंतर शिवदास सोनवणे याने शेतकऱ्याकडे लाच मागितली होती. त्यानंतर लाच मागितल्याचे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सापळा रचून सोनवणे याच्याविरोधात कारवाई केली आहे.

शेतकऱ्याकडे लाच मागणारा वनरक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात; शेतीच्या बांधबंदिस्तासाठी मागितली 10 हजारची लाच
उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 6:54 PM

पालघर: शेतकऱ्याकडून लाच (Bribe) मागणाऱ्या वनरक्षकाच्या लाचलुचपत विभागाकडून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. केवळ शेतावरील बांधबंदिस्तीसाठी शेतकऱ्यांकडून दहा हजारांची लाच मागणाऱ्या लाचखोर वनरक्षकाच्या पालघर लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवदास सोनवणे (Shivdas Sonwane) असे लाचखोर वनरक्षकाचे (Forester) नाव असून दहा हजारांची लाच घेताना वनरक्षक सोनवणेसह एका खासगी इसमाला पालघर लाचलुचपतकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले आहे.

शेतावरील बांधबंदिस्तासाठी परवानगी मागितल्यानंतर शिवदास सोनवणे याने शेतकऱ्याकडे लाच मागितली होती. त्यानंतर लाच मागितल्याचे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सापळा रचून सोनवणे याच्याविरोधात कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वनविभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

ग्रामीण भागात सध्या भ्रष्टाचार फोफावला असून यात सरकारी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची ही मोठी पिळवणूक होते. असाच काहीसा प्रकार डहाणूतील कासा येथे समोर आला आहे. शेतावरील बांधबंदिस्ती करण्यासाठी या वनरक्षकाने शेतकऱ्याकडून लाच मागण्यात आली होती.

 शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

या प्रकारामुळे वन विभागाबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. साध्या साध्या गोष्टींमुळे जर सामान्य माणसांना असा त्रास अधिकारी आणि कर्मचारी लोक देत असतील तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई का केली जात नाही असा सवाल ही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात

वनरक्षकावर कारवाई होताच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपासही सुरू आहे. वनरक्षकाबरोबरच आणखी एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर खासगी व्यक्तीला का आणले जाते आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.