AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : माजी मंत्री पंकजा मुंडे अचानक ‘गारवा’ रसवंती गृहात

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी माजलगावकडे जाताना प्रवासादरम्यान ऊसाच्या रसाचा  (sugarcane juice) आस्वाद घेतला.

VIDEO : माजी मंत्री पंकजा मुंडे अचानक 'गारवा' रसवंती गृहात
पंकजा मुंडे
| Updated on: Jan 26, 2021 | 1:11 PM
Share

बीड/मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या बीड दौऱ्यावर आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) निमित्ताने त्यांनी आज वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. या कार्यक्रमाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “वैद्यनाथचा गळीत हंगाम यंदा मी सुरू करू शकले याचा मला आनंद आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस वैद्यनाथमध्येच गळीतास आणावा. हा कारखाना लोकनेते मुंडे साहेबांचा आत्मा आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. (Former minister Pankaja Munde suddenly enters ‘Garwa’ Raswanti house, tasted sugarcane juice)

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी माजलगावकडे जाताना प्रवासादरम्यान ऊसाच्या रसाचा  (sugarcane juice) आस्वाद घेतला. त्याबाबतची माहितीही त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. “माजलगावकडे जात असताना टालेवाडी फाटा येथे श्री गणेश बडे यांच्या ‘गारवा’ रसवंती गृहाला भेट देऊन उसाचा रस पिण्याचा आनंद घेतला”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी या दौऱ्यावेळी ठिकठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांचे सत्कार केले. “नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी ग्राम पंचायतची निवडणूक बिनविरोध पार पडली.आज नियोजित कार्यक्रमानिमित्त माजलगावकडे जात असताना चोपनवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांनी भेट घेऊन सत्कार केला”, असंही ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडेंचा महाबळेश्वर दौरा

नुकतंच पंकजा मुंडे यांनी महाबळेश्वर दौरा केला होता.  त्यांनी मुलगा आणि पतीसोबत महाबळेश्वरची छोटी टूर केली होती. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पंकजा मुंडे यांनी या टूरच्या निमित्ताने आलेले काही अनुभवही शेअर केले. लोकांनी गाडी थांबवून फोटोसाठी केलेली विनंती, लोकांच्या प्रेमाचा, आग्रहाचा किस्सा पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

संबंधित बातम्या  

पंकजा मुंडे हवा बदलासाठी महाबळेश्वरमध्ये, दोन फोटोंसह नवा किस्सा शेअर    

धनंजय मुंडे अडचणीत, पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, जयंत पाटील म्हणतात….  

पंकजा मुंडे कुठे आहेत?; मौनामागचं कारण काय? 

(Pankaja Munde Mahabaleshwar)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.