AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahajibapu Patil: दररोज संध्याकाळी 2 क्वार्टर दारु आणि 4 किलो मटण खाणारा गद्दार आमदार, गुवाहाटीफेम शहाजीबापू पाटील यांच्यावर माजी शिवसेना जिल्हाप्रमुखांची सडकून टीका

शहाजीबापू पाटील यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये आपल्याकडून घेतले होते, मात्र ते अद्यापही परत केले नाहीत, असा आरोपही साईनाथ अभंगराव यांनी केला आहे. गद्दार आमदार अशी टीका शहाजीबापूंवर करताना, शहाजीबापू यांनी मतदारसंघासाठी निधी आणला आणि त्यानंतर बंगला बांधण्यास सुरुवात केली, अशी टीकाही अभंगराव यांनी केली आहे.

Shahajibapu Patil: दररोज संध्याकाळी 2 क्वार्टर दारु आणि 4 किलो मटण खाणारा गद्दार आमदार, गुवाहाटीफेम शहाजीबापू पाटील यांच्यावर माजी शिवसेना जिल्हाप्रमुखांची सडकून टीका
आ. शहाजी बापू पाटीलImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 3:09 PM

सोलापूर – दररोज संध्याकाळी ज्या आमदाराला दोन क्वार्टर दारु लागते आणि चार किलो मटण लागतं, असा आमदार शिवसेनेवर टीका करतो आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shhajibapu Patil)यांच्यावर या शब्दांत शिवसेनेचे (Shivsena)माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी टीका (criticize) केली आहे. ‘काय झाडी, काय डोंगार’ या डायलॉगमुळे एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटीच्या बंडात प्रसिद्ध झालेले आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर अभंगराव यांनी आणखीही गंभीर आरोप केले आहेत. शहाजीबापू पाटील यांच्यामुळे त्यांच्या भावावर गळफास लावून आत्महत्या करण्याची वेळ आली, असा गंभीर आरोपही अभंगराव यांनी केला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर शहाजीबापूंना बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. शिंदे यांच्या अनेक कार्यक्रमात शहाजीबापूंची उपस्थिती आणि त्यांचे भाषण हे आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. शहाजीबापूही भाषणात शिवसेनेवर सडकून टीका करतात. त्यामुळे आतास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीर शहाजीबापूंवरही शिवसेनेकडून टीका करण्यात येते आहे.

मतदारसंघाच्या निधीतून शहाजीबापूंचा बंगला – अभंगराव

शहाजीबापू पाटील यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये आपल्याकडून घेतले होते, मात्र ते अद्यापही परत केले नाहीत, असा आरोपही साईनाथ अभंगराव यांनी केला आहे. गद्दार आमदार अशी टीका शहाजीबापूंवर करताना, शहाजीबापू यांनी मतदारसंघासाठी निधी आणला आणि त्यानंतर बंगला बांधण्यास सुरुवात केली, अशी टीकाही अभंगराव यांनी केली आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरांच्या गटात गेल्यानंतर 50 कोटी मिळवले, असा जळजळीत आरोपही अभंगराव यांनी केला आहे.

दररोज दोन क्वार्टर दारु आणि चार किलो मटण- अभंगराव

शहाजीबापू पाटील यांना दररोज संध्याकाळी 2 क्वार्टर दारु लागते, 4 किलो मटण लागते, असे सांगत हा आमदार शहाजीबापू पाटील आदित्य ठाकरेंवर कुठल्या तोंडाने टीका करतो, असा सवालही अभंगराव यांनी उपस्थित केला आहे. आमदारकीसाठी पाय चाटत होतास आणि आता उध्दव ठाकरेंवर टीका करण्याची हिंमत होते आहे, असा टोलाही अभंगराव यांनी शहाजीबापू यांना लगावला आहे. सोलापुरात विनायक राऊत यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाल्यात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी ही जोरदार टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

‘काय झाडी, काय डोंगार’मुळे शहाजूबापू चर्चेत

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या काळात त्यांच्यासोबतच्या आमदारांसह ते गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी त्या आमदारांपैकी एक असलेल्या शहाजबापू पाटील यांचे एक फोनचे संभाषण व्हायरल झाले होते. त्यात त्यांनी गुवाहाटीचे वर्णन करताना काय झाडी, काय डोंगार, एकदम सगळं ओक्के, असंगुवाहाटीचं वर्णन केले होते. त्यानंतर त्यांचा हा डायलॉग चांगलाच गाजला होता. सोशल मीडियावर याचे अनेक मीम्सही तयार करण्यात आले होते.

भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव.
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.