Satara Arrest : साताऱ्यातील नरबळी प्रकरणात चौघांना अटक, तीन वर्षांपूर्वीच्या खुनामागील रहस्याचा धक्कादायक उलगडा

एका आजीबाईने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन गुप्तधनासाठी चक्क आपल्या नातीचा नरबळी दिला, असा धक्कादायक खुलासा 16 वर्षांच्या मुलीच्या हत्याकांडाच्या तपासातून झाला आहे.

Satara Arrest : साताऱ्यातील नरबळी प्रकरणात चौघांना अटक, तीन वर्षांपूर्वीच्या खुनामागील रहस्याचा धक्कादायक उलगडा
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 2:13 AM

सातारा : साताऱ्यात 16 वर्षांच्या मुलीचा खून (Murder) झाल्याची घटना 3 वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेतील 4 आरोपींना सातारा पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. त्यांच्या चौकशीतून अंधश्रद्धे (Superstition)चे कारण पुढे आले आहे. गुप्तधनासाठी आजीनेच नातीचा नरबळी दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 22 जानेवारी 2019 रोजी करपेवाडी येथे पौर्णिमेला चंद्रग्रहणाच्या दिवशी ही घटना घडली होती. मुलीला गुंगीचे औषध देण्यात आले होते. त्यानंतर तिचा एका उसाच्या शेतात धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. हा खून मुलीच्या आजीनेच केला असल्याचे उघड झाले आहे. गुप्तधनाच्या हव्यासापोटी आजीबाईनेच हे सर्व कृत्य केले आहे. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सुरुवातीला पोलिसांना मुलीच्या आई-वडिलांवर आला होता संशय

घटनेच्या सुरुवातीला पोलिसांना मुलीच्या आई-वडीलांवर संशय आला होता. त्याच संशयातून वडिलांना या प्रकरणात अटक देखील करण्यात आली होती. मात्र तपास सुरु असताना काही संशयित पुरावे हाती लागले. त्या पुराव्यांतून मुलीच्या आजीचा खुनामागे हात असल्याचा संशय बळावला. मुलीला तिच्या आजीनेच मांत्रिकाच्या मदतीने जीवे मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात हत्या झालेल्या मुलीची आजी रंजना लक्ष्मण साळुंखे, कमला आनंद महापुरे, जादूटोणा करणारे होलसिंग राठोड (विजापुर, कर्नाटक) आणि विक्रम राठोड (सोलापुरचा रहिवाशी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांनी मिळूनच अल्पवयीन मुलीची हत्या केली. हत्या करण्यामागचा उद्देश हा जादूटोणा आणि गुप्तधन मिळवणे हाच होता, असे तपासात उघड झाले असल्याचे पोलिस अधिक्षक अजयकुमार बंन्सल यांनी सांगितले.

आजीनेच आपल्या नातीचा नरबळी दिला

अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आजही व्यापक प्रमाणात चळवळ सुरु आहे. मात्र समाजातून अजूनही अंधश्रद्धेची कीड नाहीशी झालेली नाही. सातारा जिल्ह्यातील तीन वर्षांपूर्वीच्या खुनाच्या घटनेतून याची प्रचिती आली आहे. एका आजीबाईने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन गुप्तधनासाठी चक्क आपल्या नातीचा नरबळी दिला, असा धक्कादायक खुलासा 16 वर्षांच्या मुलीच्या हत्याकांडाच्या तपासातून झाला आहे. पाटण तालुक्यातील करपेवाडीत ही खळबळजनक घटना घडली होती. पोलीस तपासात या हत्याकांडातील नेमक्या कारणाचा उलगडा झाल्यानंतर पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. आजीबाईचा गुप्तधनाचा हव्यास एका निष्पाप अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतल्याबद्दल पाटण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Four arrested in connection with the murder of a girl three years ago in Satara)

हे सुद्धा वाचा

बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.