Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guillain Barre Syndrome : जीबीएस आजाराचं थैमान सुरूच, आता साताऱ्यात चार रुग्ण आढळले; गावकरी भयभीत

दूषित पाणी आणि दूषित अन्नापासून GBS चा धोका वाढत आहे. या आजारात लोकांचे अचानक हातपाय लुळे पडले असतील तर शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांनी म्हटले आहे.

Guillain Barre Syndrome : जीबीएस आजाराचं थैमान सुरूच, आता साताऱ्यात चार रुग्ण आढळले; गावकरी भयभीत
Follow us
| Updated on: Jan 30, 2025 | 8:35 PM

पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातही जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण सापडण्याचे प्रकार सुरुच आहे. पुणे,सोलापूर, नागपूर पाठापाठ आता सातारा येथे देखील जीबीएस सिंड्रोमचे चार रुग्ण सापडले आहेत.सातारा येथे १५ वर्षांच्या आतील ४ संशयित रुग्ण सापडले असून त्यांच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात दोन रुग्णांवर तर खाजगी रुग्णालयात एका तर कराडच्या कृष्णा रुग्णालयात एक अशा चार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.चारही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. या रुग्णाची चाचणी करण्यात आली असून प्रयोग शाळेत तपासणीनंतर जीबीएस आहे की नाही याचे निदान होणार आहे.

नाशिक महापालिकेचा सतर्क

जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे.नाशिक महापालिकेच्या दोन रुग्णालयात विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. अतिदक्षतेचा उपाय म्हणून महापालिकेने या आजाराच्या संशयितांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना केली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( बिटको ) रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना केली आहे. महापालिका हद्दीत खाजगी रुग्णालयात अशा पद्धतीचे रुग्ण आढळल्यास महापालिकेला कळवण्याचे आव्हान देखील मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले आहे .

सिंहगड रोड भागात जास्त प्रादुर्भाव

GBS आजाराच्या बाबत सगळ्या यंत्रणा आपापल्या ठिकाणी काम करत आहेत. GBS आजाराचा पुण्याच्या सिंहगड रोड भागात जास्त प्रादुर्भाव आहे. रुग्णांना दिलासा देण्याचे काम प्रशासन करत आहे. GBS वाढणार नाही यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहे. केंद्रीय पथकाने काही ठिकाणी भेटी दिल्या आहेत असे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रयागराजमधील विमान दरांबाबत बाबत कालच बैठक झाली आहे, याबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. एखाद्या कार्यक्रमात भेट झाल्यानंतर बोलणं होतं, तशी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात बोलणे झाले असेल असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

सांगलीतील रुग्ण संख्या सहावर

गुइलेन बॅरी सिंड्रोमचे सांगली जिल्ह्यातील आणखी तीन रूग्ण आढळल्याने या रुग्णांची संख्या आता सहावर गेली आहे. रुग्णांवर सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.या रुग्णांवर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.सांगली शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे सहा गुइलेन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आष्टा (ता.वाळवा), विटा (खानापूर) आणि नेलकरंजी (आटपाडी) येथील रूग्णांचा समावेश आहेत. या रूग्णांवर सांगली शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

600 घरांचे सर्वेक्षण

सांगली शहरात जीबीएसचे रूग्ण आढळलेल्या चिंतामणीनगरामध्ये बुधवारअखेर 600 घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करीत जलतपासणीही केली. सांगली शहरातील चिंतामणीनगरमध्ये एका रूग्णाला जीबीएस आजाराची लक्षणे आढळून आली असून त्याच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय जिल्ह्यात बुधवार अखेर जीबीएसचे सहा संशयित रूग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली आहे. सांगलीत आढळलेला रूग्ण अजमेर, आग्रा आदी ठिकाणी जाऊन आला असल्याने त्या ठिकाणी या आजाराची लागण झाली असल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. संशयित रूग्णावर योग्य उपचार सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे आणि स्वच्छतेबाबत दक्षता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. हातापायामध्ये गोळे, मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलताना, अन्न गिळताना अडचण आली तर तात्काळ वैद्यकीय उपचार करावेत. हा आजार संसर्ग जन्य नसल्याने घाबरण्याचे काही कारण नाही असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी म्हटले आहे. आहे.

धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचे निदान, Bell palsy आजार नेमका काय?
धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचे निदान, Bell palsy आजार नेमका काय?.
दमानियांचा कृषी घोटाळ्याचा आरोप, त्या आरोपांवर मुंडेंनी स्पष्ट म्हटल..
दमानियांचा कृषी घोटाळ्याचा आरोप, त्या आरोपांवर मुंडेंनी स्पष्ट म्हटल...
शिंदे ज्युनिअर, तर आदित्य ठाकरे मंत्री बनायला..., भाजप नेत्याचा पलटवार
शिंदे ज्युनिअर, तर आदित्य ठाकरे मंत्री बनायला..., भाजप नेत्याचा पलटवार.
धनंजय मुंडेंना सलग 2 मिनिटं बोलणंही कठीण, Bell’s palsy हा दुर्मिळ आजार
धनंजय मुंडेंना सलग 2 मिनिटं बोलणंही कठीण, Bell’s palsy हा दुर्मिळ आजार.
कल्याण-डोबिंवलीदरम्यान लोकलमध्ये चाकू हल्ला, कारण ऐकून बसेल धक्का
कल्याण-डोबिंवलीदरम्यान लोकलमध्ये चाकू हल्ला, कारण ऐकून बसेल धक्का.
करूणा शर्मा मुंडेंविरोधात उपोषणाला बसणार, तारीख, ठिकाणासह सारं सांगितल
करूणा शर्मा मुंडेंविरोधात उपोषणाला बसणार, तारीख, ठिकाणासह सारं सांगितल.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात? 2 वर्ष कारावास, प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात? 2 वर्ष कारावास, प्रकरण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका , कार बॉम्बने उडवणार; कोणी दिली धमकी?
एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका , कार बॉम्बने उडवणार; कोणी दिली धमकी?.
दादांचा आदेश मुंडेंनी धुडकावला, 6 आठवडे जनता दरबार नाही, कारवाई होणार?
दादांचा आदेश मुंडेंनी धुडकावला, 6 आठवडे जनता दरबार नाही, कारवाई होणार?.
'अर्धवट ज्ञान अन् खोटं...' दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंकडून खंडन
'अर्धवट ज्ञान अन् खोटं...' दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंकडून खंडन.