Navi Mumbai Lift Collapse : नवी मुंबईत इमारतीत लिफ्ट कोसळून चार मजुरांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

तळोजा फेज 2 मध्ये सिडको गृहनिर्माण योजनेचे कंस्ट्रक्शन चालू आहे. या साईटवरील बांधकामाचे साहित्य ने-आण करणारी मालवाहतूक लिफ्ट कोसळल्याने अपघात झाला आहे. या अपघातामध्ये शिर्के कंस्ट्रक्शन कंपनीचे 4 मजूर जागीच ठार झाले तर 2 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही लिफ्ट इमारतीखाली उभ्या असलेल्या कारवर पडल्याने कारचाही भुगा झाला आहे.

Navi Mumbai Lift Collapse : नवी मुंबईत इमारतीत लिफ्ट कोसळून चार मजुरांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
नवी मुंबईत इमारतीत लिफ्ट कोसळून चार मजुरांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 10:30 PM

नवी मुंबई : नवी मुंबईतील तळोजा येथील शिर्के कॉलनीतील इमारतीची लिफ्ट (Elevator) कोसळून चार मजुरांचा मृत्यू (Death) झाला. या दुर्घटनेत एक गंभीर जखमी (Injured) झाला आहे. जखमी मजुराला उपचारासाठी पनवेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तळोजा येथे नवीन इमारतीचे काम सुरू आहे. इमारतीच्या बांधकामाचे साहित्य घेऊन जाणारी लिफ्ट कोसळून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. शिर्के कंस्ट्रक्शनने दुर्घटनेची जबाबदारी स्विकारली असून मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत इमारतीखाली उभ्या असलेल्या कारचाही चक्काचूर झाला आहे. या दुर्घटनेची सिडकोककडून चौकशी करण्यात येणार आहे. हा अपघात नेमका कसा घडला हे अद्याप कळू शकले नाही.

मृतांच्या नातेवाईकांना 7 लाख रुपये तर जखमींना 2 लाख रुपये मदत

तळोजा फेज 2 मध्ये सिडको गृहनिर्माण योजनेचे कंस्ट्रक्शन चालू आहे. या साईटवरील बांधकामाचे साहित्य ने-आण करणारी मालवाहतूक लिफ्ट कोसळल्याने अपघात झाला आहे. या अपघातामध्ये शिर्के कंस्ट्रक्शन कंपनीचे 4 मजूर जागीच ठार झाले तर 2 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही लिफ्ट इमारतीखाली उभ्या असलेल्या कारवर पडल्याने कारचाही भुगा झाला आहे. संपूर्ण घटनेची सिडकोतर्फे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 7 लाख तर गंभीर जखमींच्या कुटुंबियांना 2 लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश कंत्राटदार बी. जी. शिर्के यांना सिडकोतर्फे देण्यात आले आहेत. याचबरोबर जखमींवरील उपचारांचा खर्च देखील कंत्राटदार बी. जी. शिर्के यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. जखमी दोघा मजुरांवर पनवेल येथे रुग्णालयात उपचार चालू आहेत. (Four workers die in elevator collapse at Shirke Colony in Taloja Navi Mumbai)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.