Nashik| दुधाळ जनावरांचे मोफत वाटप; कसा घ्यावा लाभ, कुठे करावा अर्ज, जाणून घ्या माहिती
सरकारच्या अनेक योजना असतात. मात्र, त्या योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. याचा फायदा दुसराच कोणी तरी उचलतो. तुमच्यासाठी आम्ही एका योजनेची माहिती घेऊन आले आहोत.
नाशिकः सरकारच्या अनेक योजना असतात. मात्र, त्या योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. याचा फायदा दुसराच कोणी तरी उचलतो. तुमच्यासाठी आम्ही एका योजनेची माहिती घेऊन आले आहोत. आता जिल्ह्यातील कष्टकऱ्यांना मदतीचा हात द्यावा म्हणून प्रशासन पुढे सरसावले आहे. त्यानुसार एका योजनेंतर्गत दुधाळ जनावरांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी कोण ठरेल पात्र, कसा घ्यावा लाभ आणि कुठे करावा अर्ज घ्या जाणून.
हे ठरतील पात्र
पशुसंवर्धन विभागामार्फत नावीण्यपूर्ण योजनेतंर्गत दुधाळ जनावरांचे गट वाटप लाभाासाठी अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती या प्रवर्गातील 18 वर्षांवरील इच्छुकांनी 18 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त बाबूराव नरवडे यांनी केले आहे.
अशी होणार निवड
नावीण्यपूर्ण योजनेअंतर्गत 02 दुधाळ गाई, म्हशीचे गट वाटप करणे, 10+1 शेळी, मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे यासाठी ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. अर्ज व योजनांची संपूर्ण माहिती https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच गुगल प्ले स्टोअरवर AH-MAHABMS ॲपवर 18 डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मोबाईलवर येईल संदेश
योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. अर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांकात बदल करू नये असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
तक्रारीसाठी येथे साधा संपर्क
अर्जदाराची प्राथमिक निवड ही अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार संगणकाद्वारे करण्यात येणार असली, तरी अंतिम निवड ही त्याने अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या अधारे करण्यात येणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नाशिक यांच्या कार्यालयात किंवा टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त बाबूराव नरवडे यांनी कळविले आहे. या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्याः