चर्चा तर होणारचः नाशिकमध्ये रस्ता दुरुस्तीसाठी व्यवस्थापकाची यथासांग पूजा अन् आरती!

सिन्नर फाटा (Nashik-Sinnar) ते सिन्नरपर्यंतच्या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करून पेकाड मोडायची पाळी आली. मात्र, सिन्नर टोलवेज कंपनी (Sinnar Tollways Company) मिटलेले डोळे उडायला तयार नाही. त्यामुळे शेवटी संतप्त झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nationalist Youth Congress) कार्यकर्त्यांनी चक्क कंपनीच्या कार्यालयात जावून अधिकाऱ्याची उदबत्ती लावून पूजा आणि निरंजन ओवाळून यथासांग आरती केली.

चर्चा तर होणारचः नाशिकमध्ये रस्ता दुरुस्तीसाठी व्यवस्थापकाची यथासांग पूजा अन् आरती!
नाशिकमध्ये रस्ता दुरुस्तीसाठी सिन्नर टोलवेज कंपनीच्या व्यवस्थापकाची यथासांंग पूजा, आरती करण्यात आली.
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 10:54 AM

नाशिकः सिन्नर फाटा (Nashik-Sinnar) ते सिन्नरपर्यंतच्या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करून पेकाड मोडायची पाळी आली. वारंवार अपघात ठरलेले. त्यात कित्येकांचे बळी गेलेले. मात्र, सिन्नर टोलवेज कंपनी (Sinnar Tollways Company) मिटलेले डोळे उडायला तयार नाही. त्यामुळे शेवटी संतप्त झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nationalist Youth Congress) कार्यकर्त्यांनी चक्क कंपनीच्या कार्यालयात जावून अधिकाऱ्याची उदबत्ती लावून पूजाआणि निरंजन ओवाळून यथासांग आरती केली. (Gandhigiri Andolan, Proper pooja and arti of the manager for road repairs)

चित्रपटालाही लाजवेल आणि अशा या आरतीची नाशिकमध्ये खुसखुशीत चर्चा सुरू आहे. नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर फाटा येतो. येथून सिन्नरपर्यंत जायचे म्हणजे अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण काय रस्त्याची झालेली चाळणी. तुमची दुचाकी असू देत की, चारचाकी. खड्डे थोडेच म्हणणार आहेत की, चारचाकी चालकांसाठी सूट देऊ. त्यामुळे रोजची दैना ठरलेली. या रस्त्याची दुरुस्ती करावी म्हणून अनेकांनी मागणी केली. मात्र, सिन्नर टोलवेज कंपनी आपल्याच गाढ निद्रेत. या संतापाचा कडेलोट केव्हा तरी होणार होता. शेवटी तोडफोड आणि आंदोलनाऐवजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी बुधवारी थेट कंपनी व्यवस्थापकांचे कार्यालय गाठले. तिथे त्यांनी केलेल्या गांधीगिरीचा किस्सा वाचून कुणीही खरोखर अंर्तमुख होईल. पदाधिकारी सिन्नर टोलवेज कंपनीचे व्यवस्थापक दीपक वैद्य यांच्या दालनात शिरले. त्यांनी त्यांच्या गळ्यात अगोदर हार घालून सन्मान केला. गोंधळलेल्या व्यवस्थापकांना नेमके काय आणि कशासाठी सुरू आहे, याचा नेमका अंदाजच आला नाही. शेवटी फुलाच्या हाराने स्वागत म्हणजे कुणाच्याही मनात मोतीचूर फुटणार. अगदी त्यांनाही तसेच झाले. मात्र, या मोतीचूरची गोडी जास्त वेळ टिकली नाही. कारण पदाधिकाऱ्यांनी लगेच उदबत्ती ओवाळली. सोबत आणलेले ताट त्यांच्यासमोर ठेवले. त्यात निरंजन पेटवले. मग काय आरतीसाठी कार्यकर्त्यांनी सूर लावला. इतके सारे काही त्या सिन्नरच्या रस्ता दुरुस्तीसाठी असल्याचे जेव्हा व्यवस्थापकांना कळले, तेव्हा ते खजील झाले.

मंगळवारी एकाचा मृत्यू

दारणा पूल ते सिन्नर फाटा रस्ता दुरुस्तीचे काम बंद पडले आहे. रस्त्यावर चिखल साचला आहे. त्यात खड्डे. मंगळवारी चेहेडी जकात नाक्याजवळ एका तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, पंचक्रोशीतील वाहनाधरकांना टोल माफ करावा, स्थानिक कामगारांवरील अन्याय थांबवा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

अन्यथा टोलफोडो आंदोलन

सध्या आम्ही गांधीगिरी करून आमचे म्हणणे व्यवस्थापकांसमोर मांडले आहे. आमच्या न्याय मागण्या मान्य झाल्या नाहीत तर टोलफोड आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गायधनी यांनी दिला आहे. या अनोख्या गांधीगिरी आंदोलनावेळी निखिल भागवत, संदेश टिळे, अनिल गायधनी, मनोज गायधनी, सूरज ठोंबरे, भगवान गायधनी उपस्थित होते. (Gandhigiri Andolan, Proper pooja and arti of the manager for road repairs)

इतर बातम्याः

NashikGold:सोने 150 रुपयांनी, तर चांदी 300 रुपयांनी महाग

‘जीव प्यारा असेल, तर हेल्मेट घाला बाबांनो’; 500 दुचाकीस्वारांचे दोन तास समुपदेशन!

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.