विसर्जन मिरवणुकीत आमदारास कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलले, पण तोल गेला अन् आमदार पडले, व्हिडिओ व्हायरल

ganesh visarjan: जळगाव शहरात मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात झाली. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे मिरवणुकीत सहभागी झाली होते. यावेळी गिरीश महाजन यांनी ठेका धरला. कार्यकर्त्यांबरोबर ते नाचू लागले.

विसर्जन मिरवणुकीत आमदारास कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलले, पण तोल गेला अन् आमदार पडले, व्हिडिओ व्हायरल
मिरवणुकीत आमदार सुरेश भोळे खाली पडले.
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 10:31 AM

राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवारी शांततेत आणि उत्साहात झाली. भक्तीपूर्ण वातावरणात पुढच्या वर्षी लवकर या…चा जयघोष करत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी मिरवणुकीत राजकीय नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. आमदार अन् मंत्र्यांनी देखील ठेका धरत गणेशभक्तांचा उत्साह वाढवला. मग एका उत्साही कार्यकर्त्यामुळे जळगावचे आमदार सुरेश भोळे खाद्यावरुन पडले. परंतु सदैव चांगले होते, त्यांना काही दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जळगाव शहरात घडला प्रकार

जळगाव शहरात मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात झाली. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे मिरवणुकीत सहभागी झाली होते. यावेळी गिरीश महाजन यांनी ठेका धरला. कार्यकर्त्यांबरोबर ते नाचू लागले. मग एका उत्साही कार्यकर्त्यांने ठेका न धरलेल्या आमदार सुरेश भोळे यांना खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या कार्यकर्त्याला तोल सांभाळता आला नाही. यामुळे आमदार सुरेश भोळे त्याच्या खाद्यावरुन खाली पडले. त्यावेळी गिरीश महाजन आणि इतर कार्यकर्त्यांनी धाव घेतली. परंतु सुदैवाने आमदार भोळे यांना काहीच दुखापत झाली नाही.

हे सुद्धा वाचा

मेहरुण तालावावर विसर्जन

जळगाव शहरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या मुख्य विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत चालल्या. जळगावात एकूण 75 पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते. वाजत गाजत जल्लोषात गणरायास निरोप देण्यात आला. शहरातील मेहरून तलावावर सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाचे विसर्जन केले. ढोल ताशांचा गजरात वाजत गाजत पुढच्या वर्षी लवकर या जयघोष करत लाडक्या बाप्पाला गणेश भक्तांनी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात निरोप दिला.

मिरवणुकीत आमदार सुरेश भोळे खाली पडले.

भाजपच्या माजी आमदाराचा ‘मैं हूं डॉन…’वर ठेका

भाजपाचे माजी आमदार सुरेश धस नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. आता त्यांचा गणेश विसर्जनातील डान्स सोशल माध्यमात चांगलाच वायरल होत आहे. बीडच्या आष्टी शहरात गणेश विसर्जना दरम्यान भाजपाचे माजी आमदार सुरेश धस मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी ‘मैं हूं डॉन…’ गाण्यावर डीजेच्या तालावर ठेका धरला. पुण्यातील विशेष बँजो पथक यावेळी मुख्य आकर्षण होते. धस यांनी विविध गणेश मंडळाला भेटी देत विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता. त्याचा हा डान्स व्हायरल होत आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.