हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, खांद्याला खांदा लावून काम करा : गिरीश महाजन

भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी कोरोना नियंत्रणात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे (Girish Mahajan criticize Thackeray Government on Corona prevention).

हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, खांद्याला खांदा लावून काम करा : गिरीश महाजन
Follow us
| Updated on: Jun 07, 2020 | 6:12 PM

नाशिक : भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी कोरोना नियंत्रणात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे (Girish Mahajan criticize Thackeray Government on Corona prevention). तसेच केवळ घरात बसून हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही. खांद्याला खांदा लावून काम करा, असं मत यावेळी गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.

गिरीश महाजन म्हणाले, “देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त वाढली. मुंबईत कोरोनाने कहर केला आहे. अक्षरशः धिंगाणा घातला आहे. राज्य सरकारने ढिसाळ निर्णय घेतले म्हणूनच महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. राज्यात नियोजनाचा मोठा अभाव आहे. अनेक नेते अजून घराच्या बाहेर निघत नाही. फक्त हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही. फक्त लढ म्हणून चालणार नाही, खांद्याला खांदा लावून काम करायला हवं.”

“टेस्टिंगबाबत मोठा गोंधळ आहे. जळगावला तर 12 दिवसांनी रिपोर्ट येतो. म्हणून झपाट्याने संख्या वाढली. दुर्दैवाने अजून चांगलं काम नाही. पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात समन्वय नाही. घरात बसून भाषण ऐकायला चांगलं वाटतं, मात्र सरकार अपयशी ठरलं आहे. संख्या वाढू नये म्हणून आकडे लपवत बसू नका. खासगी लॅब बंद केल्या काय तर म्हणे आकडे वाढत आहेत. सरकार लोकांच्या जीवाशी खेळ करत आहे. जळगावला तर स्वॅब गायब केले आहेत. यंत्रणा व्यवस्थित नसताना बदल्या करुन काहीही होणार नाही. अपयश झाकण्यासाठी उचल टाक करुन चालणार नाही,” असंही गिरीश महाजन म्हणाले.

“सोनू सूदने दुर्दैवी प्रसंगी मदत केली, तर त्यात चुकीचं काय?”

गिरीश महाजन यांनी यावेळी सामनातून अभिनेता सोनू सूदवर झालेल्या टीकेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “सोनू सूद मदत करणाऱ्यांपैकी एक आहे. दुर्दैवी प्रसंगी मदत केली तर त्यात चुकीचं काय आहे. सामनातून टीका करणं योग्य नाही.”

चक्रीवादळामुळे कोकणात मोठं नुकसान झालं. त्यासाठी 100 कोटी रुपयांच्या मदतीने काही होणार नाही. मुख्यमंत्र्यानी मोठी मदत करावी, अशी मागणीही गिरीश महाजन यांनी यावेळी केली. कोरोनाच्या संकटात केंद्राने योग्य निर्णय घेतल्याने इतर देशांच्या तुलनेत आपलं नुकसान कमी झालं आहे, असाही दावा त्यांनी केला. ते म्हणाले, “6 वर्षात देशात ऐतिहासिक निर्णय घेतले गेले. स्वप्नवत वाटणारा 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या छुप्या कारवायांना आळा बसला. सीएए कायदा बहुमताने पारित केला. राममंदिर प्रश्न संयम ठेऊन कोर्टाच्या निर्णयानुसार सोडवला.”

संबंधित बातम्या :

राज्यात 60 कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय, आणखी 7 हजार कैद्यांना सोडणार : गृहमंत्री

सोनू सूदवर ‘सामना’तील टीकेला भाजप-मनसेतून उत्तर, निरुपम यांच्याही कानपिचक्या

‘आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल’, हसन मुश्रीफांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

Girish Mahajan criticize Thackeray Government on Corona prevention

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.