Girish Mahajan Dance : गिरीश महाजन यांचा ढोल ताशाच्या तालावर भन्नाट डान्स

जळगाव : एखाद्या कार्यक्रमात अथवा शोभायात्रेत बँड किंवा ढोल-ताशाचा आवाज ऐकू यायला लागला की आपली पावलं ही आपोआपच थीरकू लागतात. त्यातच एखाद्याने त्यावर चांगला डान्स केला की तो चांगलाच व्हायरल होतो. तो व्हायरल झाला रे झाला की मग त्यावर चर्चा ही होतेच. आता अशाच एका भन्नाट डान्समुळे भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते व माजी मंत्री […]

Girish Mahajan Dance : गिरीश महाजन यांचा ढोल ताशाच्या तालावर भन्नाट डान्स
गिरीश महाजन यांनी रा्म नवमीच्या रॅलीत ठेका धरला
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 3:21 PM

जळगाव : एखाद्या कार्यक्रमात अथवा शोभायात्रेत बँड किंवा ढोल-ताशाचा आवाज ऐकू यायला लागला की आपली पावलं ही आपोआपच थीरकू लागतात. त्यातच एखाद्याने त्यावर चांगला डान्स केला की तो चांगलाच व्हायरल होतो. तो व्हायरल झाला रे झाला की मग त्यावर चर्चा ही होतेच. आता अशाच एका भन्नाट डान्समुळे भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते व माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांचा हा डान्स रामनवमी (Rama Navami) निमित्त आयोजित शोभायात्रेतील असून त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्तेही मिरवणुकीत बेधुंद होऊन नाचत आहेत. गिरीश महाजन यांचा बॅण्डच्या तालावरील डान्सचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे त्यांची नावाची चर्चा अख्या महाराष्ट्रात होत आहे.

रामाची विशेष पूजा

आपल्या देशात रामनवमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते. राम नवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. याअनुशंगाने जळगावमध्येही रामनवमीचे मोठ्या थाटा माटात अयोजन करण्यात आले होते. तर यावेळी शोभायात्रेचे आयोजन ही करण्यात आले होते. ज्यात बँड आणि ढोल-ताशाही होता. त्यामुळे या रामनवमीला वेगळाच झगमगाट पहायला मिळाला. याच झगमगाटात जळगावाचे भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांचेही वेगळेपण पुन्हा एकदा जळगावकरांना अनुभवायला मिळाले. गिरीश महाजन हे आपल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात कायमच चर्चेत असतात. आता ते आपल्या वक्तव्यामुळे नव्हे तर त्यांच्या भन्नाट डान्समुळे चर्चेत आले आहेत. गिरीश महाजन यांचा बॅण्डच्या तालावरील डान्सचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे जळगावात महाजनानांच्या नावाचीच चर्चा सध्या सुरू आहे.

पाहा गिरीश महाजन यांचा डान्स

भव्य रॅली

रामनवमी निमित्त जामनेर शहरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर गणेश वाडी मित्र मंडळातर्फे भव्य रॅली काढण्यात आली होती. ज्यात बॅण्डसह ढोल-ताशा ही होता. या बॅण्ड आणि ढोल-ताशामुळे तरुण सगळं विसरून नाचत होते. यादरम्यान या शोभायात्रेत गिरीश महाजन आले आणि त्यांना कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेतले. यावेळी उपस्थित तरुणांनी त्यांना डान्स करण्यासाठी आग्रह केला. ज्यामुळे महाजन यांना नकार देणे ही जमले नाही. आणि नाही म्हणणाऱ्या महाजन यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. तसेच महाजन यांनी यावेळी बॅण्डच्या गाडीवर चढत डान्स केल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. त्याचबरोबर महाजन यांनी गाडीवर चढून जय श्रीराम जयघोष करत जल्लोष साजरा केल्याचेही दिसत आहे. तर महाजन यांनी या शोभायात्रेत तरुणांसमवेत ढोल ताशांच्या गजरात ताल धरल्याचेही दिसत आहे

महाजनांचे दिलखुलास डान्स

याच्याआधीही जळगावातील शिवजयंतीच्या मिरवणुकीत गिरीश महाजनांचा दिलखुलास डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात ते आपल्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून डान्स करत होते. तर ज्यावेळी काश्मिरमधून कलम 370 रद्द करण्यात आले होते त्यावेळी ही महाजनानांच्या भन्नाट डान्सटची चर्चा झाली होती.

इतर बातम्या : 

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नीचा चाकूने भासकून खून; पत्नी ठार झाल्यानंतर पती फरार, पोलिसांचा शोध सुरु

Raj Thackeray Uttar Sabha : भोंगे ते हिंदुत्व, राज ठाकरे यांची उत्तरसभा कोणत्या 5 मुद्द्यांवर होणार?

Pune Murder : अनैतिक संबंधांतून पतीनं पत्नीला चाकूनं भोसकलं! 23 वर्षीय पत्नीच्या हत्येनं खळबळ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.