नाशिकचे दिल्ली होऊ नये म्हणून प्रयत्न, प्रदूषणावर Go Green Cab चा उतारा; महिला उद्योजकांचा अनोखा उपक्रम

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना संमेलन स्थळी जाण्यासाठी गो ग्रीन कॅबद्वारे मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे.

नाशिकचे दिल्ली होऊ नये म्हणून प्रयत्न, प्रदूषणावर Go Green Cab चा उतारा; महिला उद्योजकांचा अनोखा उपक्रम
नाशिकमध्ये रविवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गो ग्रीन कॅबची सेवा सुरू करण्यात आली.
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 12:57 PM

नाशिकः नाशिक शहराचे प्रदूषणामुळे दिल्लीसारखे हाल होऊ नयेत म्हणून आतापासूनच प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याचा भाग म्हणून शहरात रविवारी Go Green Cab सेवा सुरू करण्यात आली. पालकमंत्री छगन भुजबळ आणि महापौर सतीश कुलकर्णी यांनी या सेवेला हिरवा झेंडा दाखवला. या सेवेसाठी तीन महिला उद्योजकांनी पुढाकार घेतला असून, त्यांचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. जगात सगळीकडे होणारे प्रदूषण कारखान्यापेक्षा जास्त वाहनांतून होते. त्यामुळे संपूर्ण जग हो ग्लोबल वॉर्मिंगला सामोरे जात असून, त्याचे अनेक दुष्परिणाम निसर्गातील प्रत्येक घटकाला सोसावे लागत आहेत. यातून बचाव करण्यासाठी आपल्याला प्रदूषण विरहित वाहनांचा वापर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रदूषण विरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी भुजबळ यांनी केले.

यांनी घेतला पुढाकार

‘गो ग्रीन’चे संचालक हिना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढय्या यांनी इलेक्ट्रिक कॅब्स सर्व्हिसेस च्या माध्यमातून ‘गो ग्रीन’ ही सेवा सुरू केली आहे. ज्याचा उद्देश, नाशिककरांना पर्यावरणापूरक, आणि निसर्गाशी जोडू पाहणारे आयुष्य देणे, हाच होता. नाशिक मध्ये वाढत्या वाहनांच्या प्रदूषणावर तोडगा काढणे, हे ह्या संकल्पनेमधील पहिले पाऊल होते, आणि त्याचीच प्रचिती म्हणून इलेक्ट्रिक कॅब्स ही संकल्पना उदयास येऊन, ती त्यांनी प्रत्यक्षात आणली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

इतर बातम्याः

भुजबळ फार्ममध्ये उद्घाटन

भुजबळ फार्म येथील कार्यालयात Go Green Cab सर्व्हिसेसचा शुभारंभ पालकमंत्री छगन भुजबळ व महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, साहित्य संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक जगदीश पवार, गो ग्रीनचे संचालक हिना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढय्या, श्रमिक शहा, मोहित भाटिया, अनुप मढय्या यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सदाबहार नाशिकसाठी प्रयत्न

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जगभरात प्रदूषण वाढत असल्याने जगात सगळीकडे प्रचार प्रसार सुरू असून इलेक्ट्रॉनिकसह इतर प्रदूषण विरहीत वाहनांना पसंती देण्यात येत आहे. नाशिक मध्ये देखील पहिल्यांदाच ‘गो ग्रीन’ उपक्रम सुरू होत आहे. हा चांगला उपक्रम नाशिक शहरात सुरू होत असून, आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. नाशिक शहर अधिक स्वच्छ, सुंदर व प्रदूषण मुक्त कस राहील यासाठी आपले प्रयत्न आहेत.

संमेलन स्थळी कॅब

भुजबळ म्हणाले की, ‘गो ग्रीन’ हा उपक्रम नाशिकमधील तीन महिलांनी सुरू केला आहे. उद्योग व्यवसायात महिला देखील पुढे येत आहे. ही आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना संमेलन स्थळी जाण्यासाठी गो ग्रीन कॅबद्वारे मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे, त्याबद्दल भुजबळांनी त्यांचे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महापालिका अग्रेसर

महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी अशा प्रकारचे उपक्रम सुरू होण्याची आवश्यकता आहे. नाशिक शहराचे दिल्ली होऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पर्यावरणपूरक वाहने वापरण्यास नाशिक महानगरपालिकेकडून देखील करण्यात येत आहे. नाशिककरांनी देखील प्रदूषण विरहित वाहनांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जरंडेश्वरप्रमाणेच खोतकरांचा घोटाळा, सोमय्यांचा आरोप; नांगरे-पाटलांची पत्नी, सासऱ्यांचेही घेतले नाव, चौकशीच्या मागणीसाठी उद्या दिल्लीला जाणार

शरद पवारांच्या दोन निकटवर्तीयांना ईडीची नोटीस, सोमय्यांचा दावा; अजित पवारांबद्दल मात्र यू टर्न

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.