स्वस्तात सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी! आजपासून तुमच्या राशीत चार दिवस सुवर्णयोग, असा साधा मुहूर्त
Golden opportunity on Gold: स्वस्तात सोनं खरेदी करण्याची आजपासून तुम्हाला संधी उपलब्ध झाली आहे. Sovereign gold bond scheme 2022-23 या योजनेतून सरकार ही संधी उपलब्ध करुन देत आहे. आजपासून चार दिवस तुम्हाला सरकारच्या सुवर्ण रोख्यात गुंतवणूक करता येईल. आरबीआयने ही योजना जाहीर केली आहे.
गुंतवणुकीच्या चांगल्या पर्यायाच्या शोधात असाल तर आजपासून तुमच्या राशीत पुढील चार दिवस सुवर्ण योग आहे. याचा मुहूर्त तुम्ही मनावर घेतलं तर तुम्हाला ही साधता येईल. गटंगळ्या खात असलेल्या शेअर बाजाराकडून काही दिवसात तुमचे नुकसान झाले असेल आणि पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण करायचा असेल तर अशी सुवर्ण संधी तुम्हाला लवकर गवसणार नाही. गुंतवणुकीसाठी (Investment) आणखी एक चांगला पर्याय समोर आला आहे. ब-याच कालावधीनंतर सरकार बाजारात पुन्हा गोल्ड बाँड (Gold Bond)घेऊन येत आहे. सध्याच्या चालू आर्थिक वर्षाकरीता(fiscal year) म्हणजे वर्ष 22-23 साठी सरकार सॉवरेन सूवर्ण रोखे योजना घेऊन आली आहे. या योजनेतील या वर्षातील पहिली मालिका असेल. त्यामुळे शेअर बाजारात हात पोळलेल्या गुंतवणुकदारांसाठी ही एक चांगली संधी आहे. या बाँडमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते. Sovereign gold bond scheme 2022-23 या योजनेतून सरकार सर्वसामान्यांना सुवर्ण रोखे खरेदी करण्याची संधी आजपासून उपलब्ध करुन देत आहे. देशातील सोन्याची विक्री आणि आयात कमी करण्यासाठी 2015 पासून सरकार प्रयतरत्न आहे. त्यामुळे यंदाही आरबीआयने ही योजना जाहीर केली आहे.
20 ते 24 जून दरम्यान गुंतवणुकीची संधी
जर तुम्ही ही या सुवर्ण रोख्यात गुंतवणुक करु इच्छिता असाल तर ही संधी आजपासून, 20 जूनपासून गुंतवणुकदारांना मिळणार आहे. 24 जूनपर्यंत त्यांना या संधीचा फायदा घेता येईल. या सुवर्ण रोख्यांसाठी इश्यु प्राईस हा 5091 रुपये प्रति ग्रॅम ठेवण्यात आला आहे. जर तुम्ही डिजिटल पद्धतीने अथवा ऑनलाईन पद्धतीने रक्कम अदा करणार असाल तर तुम्हाला सुवर्ण रोखे योजनेत 50 रुपयांची सवलत मिळेल.याचा सरळ अर्थ तुम्हाला गोल्ड बाँड चा इश्यु प्राईस 5041 रुपयांना पडेल. त्यामुळे प्रति ग्रॅम हा अतिरिक्त फायदा तुम्हाला मिळणार आहे.
काय आहे ही योजना
Sovereign gold bond scheme 2022-23 ही योजना भारतीयांचे सुवर्ण प्रेम जपणे आणि त्याला आवर घालणे यासाठी सरकारने काढलेली एक व्यापक मोहीम म्हणता येईल.देशातील सुवर्ण विक्री कमी करणे आणि सोन्याची आयात कमी करणे यावर या योजनेत भर देण्यात येतो.भारताच्या मध्यवर्ती बँकेने अर्थात आरबीआयने नोव्हेंबर 2015 मध्ये ही योजना पहिल्यांदा सुरु केली होती. भारत सरकार आणि आरबीआय दरवर्षी या योजनेतंर्गत अनेक मालिका बाजारात आणते. प्रत्येक मालिकेत त्यावेळी असलेल्या सोन्याच्या भावाच्या अनुरुप सुवर्ण रोखे बाजारात विक्रीस आणून दर निश्चित करण्यात येतात.
सुवर्ण रोख्यातील गुंतवणुकीच्या मर्यादा
या योजनेतंर्गत कोणत्याही व्यक्तीला एका वेळी 1 ग्रॅम पासून ते 4 किलो ग्रॅमपर्यंतचे मूल्य असलेले सोने खरेदी करता येते. हिंदु अविभक्त कुटुंबासाठी खरेदीची मर्यादा 4 किलोग्रॅम आहे. तर एखाद्या संस्थेसाठी ही मर्यादा 20 किलोग्रॅम आहे.
सुवर्ण रोख्यातील परतावा
Sovereign gold bond चा कालावधी हा 8 वर्षांचा आहे. तर 5 वर्षात तुम्हाला यातील गुंतवणूक काढता येत नाही. या बाँडवर गुंतवणुकदाराला 2.5 टक्के दराने व्याज प्राप्त होते. तसेच बाँडमधील गुंतवणूक काढताना त्यावेळेच्या सोन्याच्या दरानुसार परतावा मिळतो.