Gondia Crime : भजेपारातील ग्रामपंचायत सदस्य आर्थिक अडचणीत, नैराश्यातून रेल्वेसमोर उडी मारून स्वत:ला संपविले
भजेपार निवासी किसन मडावी हा रात्री आठ वाजताच्या सुमारास तिरोडा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म क्रमांक दोनवर आला. कुणाला काही कळण्यापूर्वीचं त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी मारली.
गोंदिया : नैराश्यातून रेल्वेसमोर उडी मारून ग्रामपंचायत सदस्याने (Gram Panchayat Member) आत्महत्या केली. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथे ही घटना घडली आहे. किसन अनंतराम मडावी (Kisan Madavi) (वय 45 वर्षे) राहणार भजेपार (Bhajepar) असे मृतक ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. किसन मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होता. अखेर त्यांनी आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. तिरोडा येथे धावत्या रेल्वे समोर उडी घेतली. यात त्यांचे शरीर रेल्वेच्या खाली कटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या या असा दुर्देवी मृत्यूने भजेपार गावात शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं
प्राप्ती माहितीनुसार, भजेपार निवासी किसन मडावी हा रात्री आठ वाजताच्या सुमारास तिरोडा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म क्रमांक दोनवर आला. कुणाला काही कळण्यापूर्वीचं त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी मारली. रेल्वेखाली आल्यानं त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. घटनेनंतर रेल्वे स्थानकावर काही वेळ तारांबळ उडाली होती. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत किसनचा मृतदेहच त्यांच्या हातात मिळाला.
मडावी कुटुंबीयांवर आघात
किसन हा गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होता. त्याच्या मनात नैराश्येचे ढग होते. ग्रामपंचायत सदस्य असल्यानं गावात मान होता. पण, आदिवासी असल्यानं त्याच्याकडं धन नव्हता. आर्थिक परिस्थितीचा सामना कसा करावा, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता. अशात त्याने स्वतःला संपविण्याचा विचार केला. तिरोडा येथील रेल्वेस्थानकावर जाऊन त्यानं रेल्वेखाली उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला. यामुळं मडावी यांच्या कुटुंबीयांवर फार मोठा आघात झाला आहे.