Video : Gondia Accident | गोंदियातील अपघात प्रकरण पेटले, गावकऱ्यांची पोलिसांवर दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज, पोलीस जखमी 

टीप्परमध्ये रेती भरली होती. ट्रॅक्टरमध्ये खात भरलेला होता. टीप्परवाल्याने ट्रॅक्टरवर धडक दिली. यात ट्रॅक्टर चालक ठार झाला. पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी १५ जूनला घडली. पाच जखमींना गोंदियातील सहयोग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी आणखी एकाचा मृत्यू झाला. पहिल्या मृतकाचं मृतदेह दवनीवाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आला.

Video : Gondia Accident | गोंदियातील अपघात प्रकरण पेटले, गावकऱ्यांची पोलिसांवर दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज, पोलीस जखमी 
गावकऱ्यांची पोलिसांवर दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 7:32 PM

गोंदिया : जिल्ह्याच्या महालगाव-मुरदाडा (Mahalgaon-Murdada) येथे अवैधरीत्या वाळू तस्करी करणारा टिप्पर व ट्रॅक्टर यांचा विचित्र अपघात बुधवार, 15 जून रोजी झाला. यात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. त्यापैकी पुन्हा एकाचा मृत्यू झाला. दोन जण या अपघातात ठार झाले. गुरुवारी 16 जून रोजी दुसरा मृतदेह आणून गावातील बाजार चौकात ठेवण्यात आला. ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले. या दरम्यान हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. प्रकरण एवढे तापले होते की गावकऱ्यांनी पोलिसांना मारहाण केली. पोलिसांची गाडी फोडली. पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले (Prataprao Bhosale) यांना मारहाण करण्यात आली. त्यांची बंदूक (Gun) गावकऱ्यांनी काढून घेतली. त्याचा व्हिडीओ व्हॉयरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

नेमकी घटना काय

टीप्परमध्ये रेती भरली होती. ट्रॅक्टरमध्ये खात भरलेला होता. टीप्परवाल्याने ट्रॅक्टरवर धडक दिली. यात ट्रॅक्टर चालक ठार झाला. पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी १५ जूनला घडली. पाच जखमींना गोंदियातील सहयोग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी आणखी एकाचा मृत्यू झाला. पहिल्या मृतकाचं मृतदेह दवनीवाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आला. मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. दुसऱ्या मृतकाचे १६ जूनला शवविच्छेदन करण्यात आले. गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. लोकं जमा झालं. पोलीस फौजफाटा गावात तैनात करण्यात आला. गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्या घटनेत पाच पोलीस जखमी झाले.

हे सुद्धा वाचा

प्रशांत आगासेंचा घटनास्थळी मृत्यू

ट्रॅक्टरवरील पाच शेतमजूर गंभीर जखमी झाले. प्रशांत धर्मराज आगासे यांचा मृत्यू झाला. गोविंद योगराज आगासे, गुलशन बलीराम कावळे, शैलेश भोयर, विशाल मुन्नालाल नागपुरे, उमेश शंकर आगासे असे गंभीर जखमीचे नाव आहेत. गंभीर जखमीवर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती कळताच लोकांनी एकच गर्दी घटनास्थळी होत संतप्त लोकांनी टिप्पर जाळला. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.