Trains canceled : रेल्वे प्रवाशांचा पुन्हा दहा दिवस मनस्ताप वाढला, सणासुदीच्या काळातही 58 रेल्वेगाड्या रद्द, विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस सुटणार नागपूरवरून

काचेवानी ने तुमसर रोड व काचेवानी रेल्वेस्थानकापर्यंत थर्ड लाइन आणि इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरु आहे. त्यामुळे 22 नियमित आणि 36 साप्ताहिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Trains canceled : रेल्वे प्रवाशांचा पुन्हा दहा दिवस मनस्ताप वाढला, सणासुदीच्या काळातही 58 रेल्वेगाड्या रद्द, विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस सुटणार नागपूरवरून
सणासुदीच्या काळातही 58 रेल्वेगाड्या रद्दImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 3:07 PM

गोंदिया : मागील तीन महिन्यांपासून रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक रुळावर आले नाही. त्यातच आता दक्षिण-पूर्व व मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत थर्ड लाइन आणि इंटर लॉकिंगच्या कामामुळे 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या 9 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष बाब अशी की 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान विदर्भ आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस (Maharashtra Express) ही नागपूरवरूनच सुटणार (depart from Nagpur) आहे. एकूण 58 रेल्वेगाड्या ऐन सणासुदीच्या कालावधीत रद्द केल्याने प्रवाशांना पुन्हा दहा दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत थर्ड लाइनचे काम राजनांदगाव ते बोरतलावपर्यंत पूर्ण झाले आहे. यापुढील काम शिल्लक आहे. काचेवानी ने तुमसर रोड व काचेवानी रेल्वेस्थानकापर्यंत थर्ड लाइन आणि इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरु आहे. त्यामुळे 22 नियमित आणि 36 साप्ताहिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या रेल्वे गाड्या झाल्या रद्द

30 ते 5 सप्टेंबरपर्यंत रद्द असलेल्या गाड्यांमध्ये दुर्ग-गोंदिया स्पशेल व गोंदिया दुर्ग रायपूर, स्पेशल, गोंदिया- इतवारी, गोंदिया- इतवारी मेमू रायपूर इतवारी स्पेशल, इतवारी- रायपूर, कोरबा- इतवारी, इतवारी- बिलासपूर, इंटरसिटी, टाटानगर, शालिमार एक्स्प्रेस, अमृतसर- कोरबा एक्स्प्रेस, कोरबा-अमृतसर एक्स्प्रेस हावडा मेल, मुंबई मेल, हावडा- अहमदाबाद, अहमदाबाद हावडा, आझाद हिंद एक्स्प्रेस, एलटीटी शालिमार एक्स्प्रेस, सिंकदराबाद रायपूर- सिकंदराबाद, बिलासपूर भगत की कोठी, रिवा इतवारी, पुरी – गांधीधाम, गांधीधाम-पुरी, पोरबंदर या गाड्या रद्द राहणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना पुन्हा आठ ते दहा दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आधीच छत्तीसगढ़ मधील रायपूर- झारसुगडा विभागातील चौथ्या रेल्वे मार्गाच्या विद्युत जोडनीसाठी 21 ते 31 ऑगस्टदरम्यान 10 दिवस 34 रेल्वे गाड्या रद्द असताना आता पुन्हा 58 रेलवे गाड्या 30 ते 5 सप्टेंबर पर्यर्यंत रद्द झाले.

भुसावळ विभागातून जाणाऱ्या 24 रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ गणेशोत्सवाला सुरुवात होत असताना भुसावळ भागातून जाणाऱ्या 24 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व -मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात प्री-नॉन इंटरलॉकिंग/नॉन इंटरलॉकिंग कामामुळे 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या काळात 24 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सण, उत्सवाच्या काळात रेल्वे विभागाने हा निर्णय घेतल्यानं त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्या 30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर – 18029 व 30 शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस, 12809 व 10 हावडा-मुंबई सीएसएमटी मेल, 12833 व 34 हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, 12129 व 130 हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, 12101 व 102 एलटीटी शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस (1.4 आणि 5 सप्टेंबर), 22846 हाटिया पुणे एक्स्प्रेस (2 सप्टेंबर), 22845 पुणे-हटिया एक्स्प्रेस (4 सप्टेंबर), 12812 हटिया-एलटीटी एक्स्प्रेस 12906 शालिमार-पोरबंदर एक्स्प्रेस (2 आणि 3 सप्टेंबर), 12811 एलटीटी-हटिया एक्स्प्रेस (4 आणि 5 सप्टेंबर), 12905 पोरबंदर-शालिमार एक्स्प्रेस (31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर), 20822 संत्रागाची-पुणे हमसफर एक्स्प्रेस, 22893 साईनगर शिर्डी- हावडा एक्स्प्रेस (3 सप्टेंबर), 20821 पुणे- संत्रागाची हमसफर एक्स्प्रेस (5 सप्टेंबर), 22894 हावडा साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (1 सप्टेंबर), 22905 ओखा-शालिमार एक्स्प्रेस (4 सप्टेंबर), 22904 शालिमार- ओखा एक्स्प्रेस (6 सप्टेंबर), 18109 व 110 टाटानगर-इतवारी एक्स्प्रेस (30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर).

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.