घरच्या कमाईवरून वडील-मुलात वाद; त्यातून घडली ही भयानक घटना

वडिलांनी मुलाला दोन ट्रॅक्टर घेऊन दिले. परंतु मुलगा हा त्यातून मिळणारी कुठलीही कमाई वडीलास देत नसे. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच कारणावरुन वडील आणि मुलगा यांच्यात पुन्हा वाद झाला.

घरच्या कमाईवरून वडील-मुलात वाद; त्यातून घडली ही भयानक घटना
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 8:23 AM

गोंदिया : वडिलांनी मुलाला दोन ट्रॅक्टर खरेदी करून दिले. त्यातून मुलगा उत्पन्न घेऊ लागला. ट्रॅक्टर खरेदी करताना वडिलांना पैसे खर्च केले. पण, ट्रॅक्टरचे उत्पन्न मुलगा वडिलांना देत नव्हता. यातून वडील आणि मुलगा यांच्यात वाद होत होते. या वादातून मुलाने वडिलांवरच हल्ला केला. यात वडील जखमी झाले. त्यानंतर मुलगा तिथून पसार झाला. वडिलांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्यासाठी पोलिसांना गुप्त बातमीदारांची मदत घ्यावी लागली. मुलगा खून करून पळून गेला होता.

गुप्त बातमीदारामार्फत माहिती

गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे दवणीवाडा हद्दीतील बोदा गावातील भैयालाल पतिराम नागदेवे (वय 52 वर्षे) यांचा खून झाला आहे. अशी माहिती पोलीस ठाणे दवणीवाडा यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे खून प्रकरणातील आरोपीचा शोध घेत होते. गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. खून प्रकरणातील आरोपी लंकेश भैयालाल नागदेवे हा मृतकचा मुलगा आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपी घटनास्थळावरून पसार

आरोपीस वडिलांनी दोन ट्रॅक्टर घेऊन दिले. परंतु आरोपी हा त्यातून मिळणारी कुठलीही कमाई वडीलास देत नसे. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच कारणावरुन मृतक वडील आणि आरोपी मुलगा यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यातूनच आरोपीने मृतक वडिलांना काठीने मारहाण केली. जीवानिशी ठार करून आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. गोपनीय बातमीदार मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपी हा वरठी जि. भंडारा येथे असल्याचे माहीत झाले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टाफसह त्वरित वरठी येथे गेले. आरोपीचा वरठी गावामध्ये शोध घेऊन लंकेश नागदेवे (वय 24 वर्षे) यास ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन त्यास घडलेल्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली. लंकेशने वडिलांचा खून केल्याचे कबूल केले. आरोपीस गुन्ह्याचे अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई होण्यास दवणीवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील कारवाई दवणीवाडा पोलीस करीत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.