Gondia ST | मुरकुटडोह दंडारीत अद्यापही लालपरी पोहचलीच नाही; 18 किलोमीटरचा सायकल, दुचाकी किंवा पायी प्रवास

गावकऱ्यांना 18 किलोमीटरचा प्रवास पायी किंवा दुचाकी वाहनाने करावा लागतो. मुरकुटडोह दंडारी गावाची लोकसंख्या जवळपास 700 च्या आत आहे. या गावाला लागून मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि महाराष्ट्र या तीन राज्यांची सीमा आहे. मात्र, नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे या गावात रस्ता देखील नाही.

Gondia ST | मुरकुटडोह दंडारीत अद्यापही लालपरी पोहचलीच नाही; 18 किलोमीटरचा सायकल, दुचाकी किंवा पायी प्रवास
मुरकुटडोह दंडारीत अद्यापही लालपरी पोहचलीच नाहीImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 5:50 AM

गोंदिया : देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ( Amrut Mahotsav of Independence) साजरा होत आहे. अनेक गावांत आजही वाहतुकीच्या सोयी सुविधा पोहचल्या नाही. गावकऱ्यांना यातना सहन करून प्रवास करावा लागतो. असचं एक गाव आहे सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह दंडारी (Murkutdoh Dandari). आदिवासीबहुल (Adivasi Bahul) नक्षल क्षेत्र अशी या गावाची ओळख. एसटी माहामंडळाची बस तर सोडा साधी काळी-पिवळी गाडीही गावात यायला तयार नाही. त्यामुळं गावकऱ्यांना 18 किलोमीटरचा प्रवास पायी किंवा दुचाकी वाहनाने करावा लागतो. मुरकुटडोह दंडारी गावाची लोकसंख्या जवळपास 700 च्या आत आहे. या गावाला लागून मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि महाराष्ट्र या तीन राज्यांची सीमा आहे. मात्र, नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे या गावात रस्ता देखील नाही.

18 किलोमीटरची पायपीट

2019 मध्ये या गावाला जाण्याकरिता जवळपास 14 कोटी रुपये खर्चून मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्ता तयार करण्यात आला. मात्र तरीदेखील या गावात बस येत नाही. गावकऱ्यांनी एसटी बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी चंदू मडावी, मोहन गावडे व सोमनाथ वरखडे यांनी केली आहे. या गावात यायचे असल्यास 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या धनेगावात येऊन बस पकडावी लागते. आजही या गावात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाहीत.

त्यांना कशी दिसणार एसटी

मुरकुटडोह दंडारी हे एक उदाहरण आहे. गोंदिया, गडचिरोलीसारख्या भागात अशी काही गावे आहेत. काही पाड्यांवर तर रस्ते नाही, वीज नाही, पाणी नाही अशीही परिस्थिती आहे. चार-पाच घरांचा पाडा जंगलात राहतो. त्यांना काहीच सुविधा मिळू शकत नाहीत. विशेष म्हणजे त्यांच्याकडं रेशन कार्ड नाही, अशी काही पाडी ही जंगलात दिसतात. मग, त्यांना कशी दिसणार एसटी. सायकल, दुचाकी जंगलात चालू शकत नाही. मोबाईलचा संपर्क नाही.

हे सुद्धा वाचा

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.