गोंदिया जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींसाठी सहा उमेदवारी अर्ज, नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार?

गोंदिया जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. देवरी नगरपंचायतीमध्ये भाजपचा तर सडक अर्जुनीमध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. मोरगाव अर्जुनीमध्ये मात्र संभ्रम कायम आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींसाठी सहा उमेदवारी अर्ज, नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार?
नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करताना.
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 5:03 PM

गोंदिया : जिल्ह्यात देवरी, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी (Shiv Sena and Independent at Sadak Arjuni) या तीन नगरपंचायतीमध्ये (Nagar Panchayat) नगराध्यक्ष पदासाठी आज अर्ज दाखल करण्यात आले. देवरी येथे भाजपकडून एकमेव उमेदवार संजू उईके यांचा अर्ज दाखल करण्यात आला. सडक अर्जुनीमध्ये राष्ट्रवादीतर्फे तेजराम मडावी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष (Nargadhyaksh) हेच दोन्ही अंतिम राहणार हे निश्चित झाले आहे. मात्र मोरगाव अर्जुनी येथे कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. येथे भाजपतर्फे दोन अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये ललिता टेंभरे व ममता भैय्या यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीतर्फे मंजूषा बारसागडे यांचा अर्ज तर काँग्रेसतर्फे दिव्या पशिने यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला. यांच्यापैकी कोण अर्ज मागे घेणार हे 15 फेब्रुवारीला कळणार आहे. त्यानंतरच या ठिकाणच्या तिढा सुटणार आहे. कोणाची सत्ता स्थापन होणार हे स्पष्ट समजेल. यात शिवसेना आणि अपक्ष उमेदवार कुणाला मतदान करणार यावर सर्वांचे लक्ष वेधून आहे.

देवरीत भाजप, तर अर्जुनीत राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष?

गोंदिया जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. देवरी नगरपंचायतीमध्ये भाजपचा तर सडक अर्जुनीमध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. देवरी येथे भाजपकडून एकमेव उमेदवार संजू उईके यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे, तर सडक अर्जुनीमध्ये राष्ट्रवादीतर्फे तेजराम मडावी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळं या दोघांचे नगराध्यपदी विराजमान होणे जवळपास पक्के आहे. मोरगाव अर्जुनीमध्ये मात्र संभ्रम कायम आहे. कारण चार जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

असे आहे नगरपंचायतींचे पक्षीय बलाबल

देवरी नगरपंचायतीमध्ये भाजपचे 11, काँग्रेसचे 4, तर राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक आहेत. सडक अर्जुनी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे 7, काँग्रेसचे 2, भाजपचे 1, शिवसेनेचे 1, तर अपक्ष 6 नगरसेवक आहेत. मोरगाव अर्जुनी नगरपंचायतीमध्ये भाजपचे 7, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचे 4, शिवसेनेचे 1, तर अपक्ष 1 नगरसेवक आहेत.

गोंदियात धावती ट्रेन पकडता पकडता तोल सुटला; महिला पडणार एवढ्यात जवान आला मदतीला धावून…

Nagpur NMC | मनपाच्या स्थायी समितीकडून यंदाही करवाढ नाही, प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला

Nagpur Crime | एकटी पाहून मध्यरात्री घरात घुसले; चाकूच्या धाकावर 58 वर्षीय महिलेवर दोघांकडून बलात्कार, नागपुरात चाललंय काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.