Gondia Tribal | गोंदियातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर; स्पर्धा परीक्षांसह, क्रीडा, कलेचेही प्रशिक्षण
हे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर 5 मे ते 5 जून या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या उन्हाळी शिबिरात देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल. या प्रशिक्षण शिबिरातून 5 मुले आणि 5 मुलींची इंजिनियर आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास येथील आयोजकांनी व्यक्त केला आहे.
गोंदिया : जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालया (Deori Project Officer’s Office) अंतर्गत चालविण्यात शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 12 आदिवासी आश्रम शाळेतील मुला-मुलींना याचा लाभ देण्यात येतोय. इतर खाजगी शाळांप्रमाणे उन्हाळी शिबिराचा आनंद घेता यावे यासाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आले. या शिबिरात बारा आदिवासी आश्रम शाळेतील प्रत्येकी पाच मुला-मुलींची निवड करण्यात आली. 120 विद्यार्थ्यांनी या उन्हाळी शिबिरात हजेरी लावली. विद्यार्थी एका महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर आपल्या शाळेत परत जातील. तेथील मुलांना प्रशिक्षण देणार आहेत. देवरी प्रकल्प अधिकारी कार्यालया अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर चालविण्यात येते. आदिवासी आश्रमशाळेतील मुले-मुली, काही मुले-मुली स्पर्धा परीक्षांचे धडे घेतात. काही मुली हातात ब्रश घेऊन पेंटिंग (Painting) करताना दिसतात. काही मुली योगा, जुडो, कराटे, तायकान्डो किंवा धनुष्यबाणाचे प्रशिक्षण घेतात. काहींना संगीताचे (Music) प्रशिक्षण देण्यात येत आहे.
120 मुला-मुलींची निवड
या मुलांनी यापूर्वी अशाप्रकारच्या उन्हाळी शिबिराचा आनंद घेतला नाही. त्यामुळे आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. देवरी प्रकल्प अधिकारी कार्यलयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी राज्यात पहिल्यांदाच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात यावं, यासाठी आदिवासी विकास कार्यालयासमोर प्रस्ताव ठेवला. नावीन्यपूर्ण संकल्पना असल्याने ते पूर्णही झाले. यासाठी गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या बारा शासकीय आदिवासी आश्रम शाळांतील 120 मुला-मुलींची निवड करण्यात आली.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी NEET, JEEE चे वर्ग
विशेष म्हणजे जे विद्यार्थी बारावीत आहेत, त्यांना NEET आणि JEEE या आणि सारख्या स्पर्धा परीक्षांचे धडे देण्यात येत आहेत, असे रुची उईके, प्राची उईके, अजय टेकाम यांनी सांगितलं. बोरगाव बाजार शासकीय कन्या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र भाकरे यांनी शिबिरात मिळणाऱ्या व्यवस्थेची माहिती दिली. शिबिराची संकल्पना देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी मांडली होती. हे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर 5 मे ते 5 जून या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या उन्हाळी शिबिरात देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल. या प्रशिक्षण शिबिरातून 5 मुले आणि 5 मुलींची इंजिनियर आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास येथील आयोजकांनी व्यक्त केला आहे.