घरी परत असताना काळाचा घाला, भरधाव कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडावर धडकली
ही घटना मुरपार येथील प्लायवूड कंपनीपासून काही अंतरावर घडली. या अपघातात दोघांचाही घात झाला.
गोंदिया : दोन मित्र काही कामासाठी गोंदियाला आले होते. त्यानंतर ते गोंदियाहून बालाघाटकडे त्यांच्या गावी परत जात होते. तपीन नावाचा युवक गाडी चालवत होता. त्याचे गाडीवरीन नियंत्रण सुटले. ही घटना मुरपार येथील प्लायवूड कंपनीपासून काही अंतरावर घडली. या अपघातात दोघांचाही घात झाला. पोलीस शिपाई यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे करत आहेत. घटनेनंतर मृतांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कार अनियंत्रीत झाली
गोंदिया-बालाघाट या महामार्गावर भरधाव कारने महामार्गावरील झाडाला धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दोघेही मृतक हे मध्यप्रदेश राज्यातील आहेत. ते गोंदिया वरून बालाघाटकडे जात होते. तेवढ्यात महामार्गावर त्यांची कार अनियंत्रित झाली.
घटनास्थळी दोन युवकांचा मृत्यू
आंब्याच्या झाडाला धडकली. धडक इतकी जबर होती की कारच्या समोरील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला. घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची नोंद रावणवाडी पोलिसांनी घेतली आहे. तपीन शिवप्रसाद गोनगे (वय ३० वर्षे, रा. बालाघाट) आणि राहुल विनोद बिसेन (वय २७ वर्षे, रा, बालाघाट) अशी मृतांची नावे आहेत.
संध्याकाळची घटना
तपीन हा गाडी चालवत होता. ही घटना रात्री साडेसातच्या सुमारास घडली. यावेळी अंधार पडला असल्यामुळे रस्ता योग्य पद्धतीने न दिसल्याने हा अपघात झाला असावा. दोन्ही मृतक हे बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. एक आवलाझरी बघोली येथील आहे. तर दुसरा हा खुर्शिपार खैरलांजी येथील आहे.
या अपघातामुळे दोन्ही युवकांचा जीव गेला. कारने प्रवास करताना गाडी व्यवस्थित चालवणे गरजेचे आहे. थोडीफार नजरचूक झाली तर ती महागात पडू शकते. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. संध्याकाळची वेळ असल्याने चालकाच्या लक्षात ही बाब आली नसावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.