मायलेकी कोहमाऱ्याकडे जात होत्या, ट्रकच्या धडकेत आईचा जीव गेला, दोन वर्षीय मुलीने फोडला टाहो
तिच्यासोबत दोन वर्षीय मुलगी होती. तीसुद्धा या अपघातात जखमी झाली. या मुलीने स्वतःच्या डोळ्यासमोर आईचा अपघात बघीतला. त्यानंतर आईचा मृत्यू झालेला पाहून तिनी टाहो फोडला.
शाहीद पठाण, प्रतिनिधी, गोंदिया : मायलेक दोघीही कोहमाऱ्याकडे जाण्यासाठी गोरेगावरून निघाल्या. आई २४ वर्षांची तर तिची दोन वर्षांची मुलगी सोबत होती. दोघीही गप्पागोष्टी करत जात होत्या. मध्यंतरी भगंडा नावाचे गाव आले. तेवढ्यात सुसाट वेगाने एक ट्रक आला. या ट्रकने महिलेला धडक दिली. यात महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला. तिच्यासोबत दोन वर्षीय मुलगी होती. तीसुद्धा या अपघातात जखमी झाली. या मुलीने स्वतःच्या डोळ्यासमोर आईचा अपघात बघीतला. त्यानंतर आईचा मृत्यू झालेला पाहून तिनी टाहो फोडला.
दोन वर्षीय मुलगी निराधार
मुलगी फक्त दोन वर्षांची आहे. तिची आई तिच्या डोळ्यासमोर मरण पावली. त्यामुळे आईच्या आठवणीने ती हमसून हमसून रडत होती. आईला उठवण्याचा प्रयत्न करत होती. पण, आईच्या मृत्यू झाला होता. ती स्वतः जखमी झाली होती. त्यामुळे रडण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता.
पोलीस उशिरा पोहचल्याने आक्रोश
दुर्घटनेनंतर पोलिसांना कळवण्यात आले. पण, पोलीस उशिरा पोहचले. त्यामुळे नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. महिलेचा मृतदेह गोरेगाव येथील रुग्णालयात पाठवला. जखमी मुलीवर उपचार सुरू आहेत. ट्रकचालकाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडल्याचे प्रत्येक्षदर्शी सांगत आहेत. बेलगाम ट्रकचालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दोन वर्षीय मुलगी जखमी
कोहमारा महामार्गावर ट्रकच्या धडकेत एका 24 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पायल लाखनकर असे मृतक महिलेचे नाव आहे. ती गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. मृतक महिला ही गोरेगावकडून कोहमाराकडे जात होती. भडंगा गावाजवळ ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत पायल हिचा जागीच मृत्यू झाला. तिची 2 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे.
मृतदेह ग्रामीण रुग्णालय गोरेगावात पाठवला
अपघातानंतर पोलीस एक तास झाला तरी पोहचले नव्हते. त्यामुळे मृतकाच्या नातेवाईकांमध्ये पोलिसांच्या विरोधात चांगलाच आक्रोश पाहायला मिळाला. सध्या गोरेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे पाठवला. पुढील तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत.