Hemant Gadkari : गोंदिया जिल्ह्यात महिलांचा मनसेत प्रवेश, हेमंत गडकरी म्हणतात, अमित ठाकरेंचा लवकरच विदर्भात दौरा

हेमंत गडकरी म्हणाले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेऊन गोंदिया जिल्ह्यातील शेकडो महिलांनी मनसेत प्रवेश केला. मनसे विद्यार्थी सेनादेखील या प्रवेश मेळाव्यात समोर होती.

Hemant Gadkari : गोंदिया जिल्ह्यात महिलांचा मनसेत प्रवेश, हेमंत गडकरी म्हणतात, अमित ठाकरेंचा लवकरच विदर्भात दौरा
गोंदिया जिल्ह्यात महिलांचा मनसेत प्रवेशImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 3:51 PM

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात रक्षाबंधनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महिला प्रवेश मेळाव्याचे (Women’s admission meeting) आयोजन करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यच्या आठ तालुक्यांतील शंभरच्या वर महिलांनी मनसेत प्रवेश केला. महाराष्ट्र सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. या कार्यक्रमात मनसे नेते हेमंत गडकरी, गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख राहुल बलवार आणि माजी जिल्हाध्यक्ष गोंदिया रितेश गर्ग हे उपस्थित होते. राज्यात शिंदे गट आणि भाजपाची सरकार असताना या सरकारला राज्यातील महिलांच्या सुरक्षितेची (Safety) फिकर नाही. महिलांनी रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) पवित्र सण कुणाच्या विश्वासावर साजरा करावा, असा प्रश्न महिलांना पडत आहे, अशी टीका हेमंत गडकरी यांनी केली.

राज ठाकरेंवर कार्यकर्त्यांचा विश्वास

हेमंत गडकरी म्हणाले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेऊन गोंदिया जिल्ह्यातील शेकडो महिलांनी मनसेत प्रवेश केला. मनसे विद्यार्थी सेनादेखील या प्रवेश मेळाव्यात समोर होती. महाराष्ट्राच्या सरचिटणीस रिटा गुप्ता म्हणाल्या, मला आनंद होतो. गोंदियाच्या टीमला मनापासून शुभेच्छा देते. रक्षाबंधन असताना महिला मनसेशी मोठ्या प्रमाणात जुडल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

पूर्व विदर्भावर मनसेचे लक्ष्य

हेमंत गडकरी म्हणाले, मुख्यमंत्री बदलतो. सत्ता बदलते. परंतु, सर्वसामान्य नागरिकांच्या पदरात काही पडत नाही. मनसेची वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात आता एकच पर्याय आहे. तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्याच्याकडं मनसेचा ओढा आहे. सर्वांच्या मनातली खदखद आहे. राज्यातील जनतेचा विश्वास एकाच नेत्यावर उरला आहे. तो म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे होय. गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर या भागात मनसे वाढताना दिसत आहे. आगामी काळात राज ठाकरे यांचा दौरा नक्की होणार. नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा दौरा काही दिवसात होणार आहे. ते काही दिवसात विदर्भात दौरा करणार आहेत, अशी माहिती मनसेचे हेमंत गडकरी यांनी दिली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.